Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यातील मृत्युदर होतोय कमी

पुण्यातील मृत्युदर होतोय कमी

सार्वमत

पुणे (प्रतिनिधि) – शहरात करोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. मात्र, त्याचबरोबर करोनामधून बरे होणार्‍या रुग्णांची संख्याही कमालीची वाढली आहे. शहरातील करोनामृत्यू दर 14 टक्क्यावरून 5 टक्क्यावर आला आहे. अजून 15 दिवसांनी हाच दर 4.5 टक्क्यावर येईल. सध्या गंभीर रुग्णांकडे अधिक लक्ष दिले जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात मृत्यू दर आणखी कमी होईल, असे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले.
सध्या गंभीर रुग्णांकडे अधिक लक्ष दिले जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात मृत्यू दर आणखी कमी होईल, असे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले.ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला आणि आजारी व्यक्तींचीच तपासणी करण्यावर भर दिल्याचे गायकवाड म्हणाले.
कन्टेन्मेंट झोनमधील सर्व्हेचा पाचावा राउंड सुरू आहे. यादरम्यान सरसकट तपासणी न करता फक्त 60 वर्षावरील नागरिक, गरोदर महिला आणि आजार असलेल्या व्यक्तींचीच तपासणी करण्यावर भर दिला आहे, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, शहरातील जनजीवन पुन्हा सुरू होत आहे. रुग्णसंख्या वाढताना दिसत असली तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये. नवीन रुग्ण शोधून त्यांना उपचार देऊन बरे करणे, ही प्रकिया म्हणजेच कोरोनसोबत जगणे होय. याच पद्धतीने आपल्याला करोनावर मात करता येईल. रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेग मंदावला -एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात चार दिवसांनी रूग्णसंख्या दुप्पट होत होती. नंतर सहा दिवसांनी, आठ दिवसांनी, आणि त्यानंतर 15 दिवसांनी रुग्णसंख्या दुप्पट होत आहे. यावरून करोनारोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा परिणाम सकारात्मक होत असल्याचे स्पष्ट होत आहे, गायकवाड यांनी सांगितले.
मे अखेर पुण्यात करोनाचे 9 हजार 600 रुग्ण असतील आणि 10 हजार निगेटिव्ह असतील, असा अंदाज तांत्रिक समितीने दर्शवला होता. त्यादृष्टीने 20 हजार बेडची तयारी आम्ही केली होती. सद्यस्थितीत आपल्याकडे फक्त अडीच हजारपेक्षा जास्त पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे याआधी केलेली तयारी जून अखेरपर्यंत पुरेल असा विश्वासही शेखर गायकवाड यांनी व्यक्त केला,

- Advertisement -

4 जून – पुण्यातील करोना रुग्ण स्थिती
……….
– दिवसभरात 176 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात घरी सोडलेले रुग्ण – 157
– बरे होऊन घरी सोडलेले आता पर्यतचे
एकूण रुग्ण – 4505
– आज दिवसभरातील एकूण मृत्यू -11
– पुण्यातील एकूण मृत्यू – 361
– शहारतील एकूण गंभीर रुग्ण – 176
– व्हेंटिलेटरवर उपचार सुरू असलेले रुग्ण – 40
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 7265
– पुण्यातील अ‍ॅक्टिव्ह रुग्ण संख्या – 2299
– आजच्या घेतलेल्या एकूण चाचण्या- 1441

- Advertisment -

ताज्या बातम्या