पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आतापर्यंत 30.76 लाख घरांना मंजूरी

0

25 जून 2015 रोजी प्रधानमंत्री आवास योजना (शहर) लागू झाल्यापासून आत्तापर्यंत सरकारने एकूण 30.76 लाख घरांना मंजूरी दिली आहे.

सध्या 15.65 लाख घरांचे बांधकाम सुरु असून, अंदाजे 4.13 लाख घरांचे बांधकाम पूर्ण झाले आहे, अशी माहिती गृह आणि शहर व्यवहार (स्वतंत्र प्रभार) राज्यमंत्री हरदीप सिंग पूरी यांनी दिली.

प्रधानमंत्री आवास योजना (शहर) आणि स्वच्छ भारत अभियान (शहर)च्या अंमलबजावणीला प्रोत्साहन देण्यासाठीच्या राष्ट्रीय कार्यशाळेच्या उद्‌घाटन प्रसंगी ते आज नवी दिल्लीत बोलत होते.

शहरी भारत सध्या अनेक बदलांमधून जात आहे. राष्ट्रीय आर्थिक प्रक्रिया आणि तिचे जागतिक संबंध या दोघांमधे शहरांची भूमिका महत्वपूर्ण असल्याने शहरांचा विकास होणे फार गरजेचे आहे.

रोजगार, व्यापार, वाणिज्य, उद्योग आणि इतर सेवांची मागणी वाढत असल्याने शहरांनी त्यांच्या पूर्ण क्षमतेने काम करायला हवे, असे पूरी यांनी सांगितले.

गृह निर्माण क्षेत्र हे आर्थिक विकासाचे इंजिन आहे. हे अर्थ व्यवस्थेतील एक महत्वपूर्ण क्षेत्र असून, ज्यामुळे रोजगार निर्मिती होते.

त्यावरील कर संकलनाचा सकारात्मक परिणाम नागरिकांच्या राहणीमानावर होतो. वर्ष 2022 पर्यंत सर्व भारतीय नागरिकांना सक्षम करण्याची महत्वकांक्षी योजना केंद्र सरकारने तयार केली आहे, असेही पूरी यांनी यावेळी सांगितले

LEAVE A REPLY

*