जादा आवकेने कांदा दराचा वांदा

0
नाशिक । कांद्याचे घसरलेले दर एकीकडे शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी असताना, कोथिंबीर मात्र शेतकर्‍याना चांगलाच आर्थिक परतावा देत आहे. नाशिक बाजार आवारात कोथिंबीर 17 हजार रुपये शेकड्याने लिलावात विक्री झाली. बाजार समितीत सर्व कृषीमालाच्या दरापेक्षा कोथिंबीरीने सर्वाधिक भाव खालला आहे.

बाजार आवारात जी कोथिंबीर सर्वाधिक दराने विक्री झाली तीच अर्थात फक्त 225 जुडया एवढीच होती. तसेच ही कोथिंबीर इतर कोथींबीर जुड्यापेक्षा मोठ्या आकारात बांधणी केलेली आणि गावठी वाण प्रकारातील होती.

अशा प्रकारच्या कोथिंबीरीची काडी ठणक आणि अधिक दिवस टिकणारी, ग्राहकांकडून सर्वाधिक खरेदीला पसंती मिळणारी असते. कणाशी येथील शेतकरी सचिन आहेर यांनी या कोथिंबीरीच्या 225 जुड्या मार्केट यार्डात लिलावात विक्रीसाठी आणल्या होत्या. मुंबई येथील व्यापारी रवी धोत्रे या व्यापार्‍याने 17 हजार रुपये शेकडा या सर्वाधिक दराने लिलावात ही कोथिंबीर खरेदी केली, मात्र एवढा दर मिळणवणार्‍या कोथिंबीरीची जुडी आकाराने मोठी आणि 225 जुड्याच आवक असलेली होती, अशी माहिती जय तुळजा भवानी व्हिजीटेबल कंपनीचे राजू आंधळे यांनी दिली.

पालेभाज्यांची आवक बाजार आवारात कमी आहे. त्यात गेल्या आठ दिवसांपासून कोथिंबीर, मेथी, शेपू आणि कांदापात या भाज्यांचे दर अधिक मागणीमुळे तेजीत आले आहे. आज बाजार समितीत मेथीही पाच हजार ते सहा हजार रुपये शेकडा प्रतवारीनुसार विक्री झाली.

मेथीची आवक अवघी तीन साडे तीन हजार जुडी एवढी झालेली आहे. यार्डात मेथी विक्री कोणत्या शेतकर्‍यांनी आणली आहे, याचा शोध घेऊन व्यापारी खरेदीसाठी चढाओढ करताना दिसत आहे.कोथिंबीरीची आवक सुमारे 70 ते 80 हजार जुड्या एवढी होत आहे. मात्र, स्थानिक बाजारपेठेसह मुंबई, गुजरातच्या बाजारपेठेच्या मागणीच्या प्रमाणात ही आवक अत्यल्प असल्याने कोथिंबीर सलग पंधरा दिवसांपासून तीन हजार रुपये ते 17 हजार रुपये शेकडा दराने लिलावात विक्री होत आहे.

LEAVE A REPLY

*