नगरसेवकाचे चिखल स्नान करून पालिकेवर मोर्चा

0

मेहमुद सय्यदः अपक्ष नगरसेवक असल्याने कामे होत नाही

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी)– कोपरगाव नगर पालीकेच्या कारभारावर नाराज असलेले. अपक्ष नगरसवेक मेहमुद सय्यद यांनी चिखल स्नान करून पालीकेच्या विरोधात आपल्या प्रभागापासुन पालीकेच्या कार्यालयावर निषेध मोर्चा काढला.

आपल्या प्रभागात पालीका विकास कामे करीत नाही. मी अपक्ष नगरसेवक असल्याने मला जाणुन बुजुन प्रत्येक बाबतीत डावलेले जाते. असा आरोप करीत मेहमुद सय्यद यांनी शनिवार दुपारी 12च्या सुमारास आपल्या प्रभागातील शेकडो महीलासमवेत पालीकेच्या विरोधात मोर्चा काढला. या मार्चामध्ये सय्यद हे चिखल स्नान करून आले होते. मुख्याधिकारी शिल्पा दरेकर यांना आपल्या विविध मागण्याचं निवेदन त्यांनी दिले. सय्यद म्हणाले की, आठ महीण्यात पालीकेने एकही काम हाती घेतले नाही. नविन कामाचा ठेका नाही.

कामचुकार ठेकेदाराला काळया यादीत टाकण्याचा निर्णय झाला असताना नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी एकाही ठेकेदाराला काळया यादीत टाकले नाही.
जुने मंजुर झालेले कामे तोंड पाहुन कामे सुरू केले. तर काही ठिकाणी विना ऑर्डरचे काम सुरू आहेत. अनेक कामाच्या वर्क ऑर्डर असुनही कामाला सुरूवात झाली नाही.

गांधीनगर भागामध्ये महीलांना सार्वजनीक शौचालयाला जाण्यासाठी योग्य रस्ता नाही, नळाला पाणी ठरलेल्या वेळेत येत नाही. भुमिगत गटारी, रस्ते, घनकचरा नविन पाईपलाईन यास अनेक समस्या आपल्या प्रभागाच्या आहेत त्या पालीकेने त्वरीत पुर्ण कराव्यात अशी मागणी केली. या मागण्याचे निवेदन त्यांनी मुख्याधिकारी शिल्पा दरेकर, बांधकाम विभागाचे अभियंता विजय पाटील यांना दिले. यावेळी उपनगराध्यक्ष विजय वाजे,नगरसेवेक रविंद्र पाठक, स्वप्नील निखाडे, राजेंद्र सोनवणे, बाळासाहेब आढाव, दिनेश कांबळे उपस्थित होते.

सय्यद यांच्या समवेत मनसेचे अनिल गायकवाड ,शफिक सय्यद, सददाम सय्यद यांच्यासह शेकडो महीला होत्या.
नगराध्यक्ष विजय वहाडणे हे मोर्चाच्या वेळी पालीकेच्या दालनात अनेक नगरसेवकांसह बसले होते.पण मोर्चेकर्‍यां महीलांच्या समोर गेले नाहीत.

LEAVE A REPLY

*