जिल्हा परिषदेवर आशा कर्मचारी संघटनेचा मोर्चा

0
अहमदनगर (प्रतिनिधी)- आशा कर्मचारी व गटप्रवर्तकांच्या प्रलंबीत मागण्यांसाठी आशा कर्मचारी संघटनेच्यावतीने जिल्हा परिषदेवर काढण्यात आलेल्या मोर्चाने परिसर दणानून निघाला. मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या जिल्ह्यातील आशा कर्मचारी व गटप्रवर्तक महिलांनी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारात ठिय्या मांंडून, जोरदार निदर्शने केली.
भाकप पक्ष कार्यालयापासून मोर्चाला प्रारंभ होवून, बुरुडगाव रोड मार्गे मोर्चा जिल्हा परिषदेवर धडकला. यावेळी संघटनेच्या प्रमुख पदाधिकार्यांची भाषणे झाली. आंदोलनात जनरल सेक्रेटरी ऍड. सुधीर टोकेकर, अध्यक्ष शमा सय्यद, संघटक कॉ. सुभाष लांडे, कॉ. भगवान गायकवाड, कॉ.बन्सी सातपुते, यमुना दौंड, निशा जमधाडे, निर्मला खोडदे, उषा आहेर, सुनिता पावसे, कॉ.अस्लम सय्यद, गिता सोनवणे, प्रमिला ढाकणे, कॉ.संजय डमाळ, संध्या पोटफोडे, संगीता गायकवाड, कॉ.संतोष लहासे आदि सहभागी झाले.
राज्य आरोग्य खाते, आशा व गटप्रवर्तक संघटनाच्यावतीने (आयटक) विविध प्रश्‍नासंदर्भात अनेक आंदोलन करुन, न्यायालयात दादही मागण्यात आली. मात्र, मिळालेले फलीत अत्यंत तटपुंजे असून, शासन व प्रशासनाकडून आपल्याला योग्य वेळी कामाचा मोबदला दिला जात नाही. कर्मचारी म्हणून गणना नाही. त्यामुळे आशा व गटप्रवर्तकांची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे.
संघटनेच्या वतीने मागील हिवाळी अधिवेशनावर काढलेल्या मोर्चास पंधरा हजार रुपये देण्याचे शासनाच्या वतीने आरोग्यमंत्री दिपक सावंत यांनी आश्‍वासन दिले होते. तसा अर्थसंकल्पामध्ये पंधरा हजार रुपये देण्याचा निर्णयही झाला. परंतू शासन आदेश काढत नसल्याने मंगळवार दि.15 ऑगस्ट रोजी चंद्रपूर येथे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्याचा इशारा राज्य संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे.
सदर मागणीचे निवेदन जि.प. आरोग्य अधिकारी डॉ.बापूसाहेब नागरगोजे यांना देण्यात आले. स्थानिक पातळीवरचे प्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासन त्यांनी आंदोलकांना दिले.

LEAVE A REPLY

*