तालुक्याच्या लोकप्रतिनिधींमुळे शेतकरी अडचणीत

0

शंकरराव गडाख यांची घोडेगाव येथील फेरीत टीका

नेवासा (प्रतिनिधी)- कांदा अनुदान, पाटपाणी, कृषी खात्यातील गैरव्यवहार या शेतकर्‍यांच्या प्रश्नात फक्त स्व हित पाहत तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडले आहे. नेवासा तालुक्याच्या कृषी खात्याचा भ्रष्टाचार राज्यात गाजला असून बाहेरच्या आमदारांनी याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला. कृषी खात्यातील या भ्रष्टचारामागे कोण आहे, हे सांगण्यासाठी आता ज्योत्याषाची गरज नाही अशी टीका माजी आमदार शंकरराव गडाख यांनी घोडेगाव येथील फेरीत केली.
घोडेगाव येथे काढण्यात आलेल्या फेरीत गडाख बोलत होते. ते म्हणाले नेवासा बाजार समितीमध्ये सुमारे 1 लाख शेतकर्‍यांनी कांदा विकला. यात बहुतांशी कांदा हा तालुक्यातील शेतकर्‍यांचा आहे. यापैकी जुलै, ऑगस्टमध्ये कांदा विकलेले शेतकर्‍यांची संख्या 48 हजार आहेत. त्यातून 200 क्विंटल आत कांदा विकणारे 10 हजार शेतकरी आहेत. शेतकर्‍यांच्या कांद्याच्या प्रश्‍नावर आम्ही नेवासा तहसील कार्यालयसमोर कांदा फेकून आंदोलन केले. शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाकडे बघ्याची भूमिका घेणार्‍या आमदारांनी मात्र या आंदोलनाची चेष्टा केली. दुसरीकडे आम्ही तालुक्यातील कांदा उतापदकांना न्याय मिळवा यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
पिक विमामध्ये तालुक्यातील 20 हजार शेतकर्‍यांनी विमा उतरवला होता. मात्र, अगदी कमी शेतकर्‍यांचा विमा मंजुर झाला असून तोही फक्त हरबरा पिकाचा आहे. गहू, ज्वारी, कांदा अन्य पिकांचा विमा नाकारण्यात आला आहे. नेवासा तालुक्यातून 41 हजार 832 एकरसाठी 22 कोटींचा विमा शेतकर्‍यांनी उतरविला होता. त्यापैकी हरबरा पिकाकसाठी 13 कोटींचा होता. तालुक्यातील 26 हजार 960 एकरवरील 69 लाखांचा पिकविमा मंजूर झाला आहे.
तालुक्यात सर्वात जास्त पेर असतांना व 50 टक्क्यांच्या आता आणेवारी असणारे क्षेत्र अधिक असतांना तालुक्यातील शेतकर्‍यांवर अन्याय झालेला आहे. त्याउलट अन्य तालुक्यांना कोट्यावधी रुपयांची भरपाई मिळालेली आहे. कृषी विभागाच्या अधिकार्‍यांवर दबाव आणत सरकारकडून मोफत आलेले बियाणे कुकाणा येथील राजकीय वरदहस्त असणार्‍यांच्या कृषी सेवा केंद्रात विकले गेले हे कुणी केले? आपल्या कृषी पदवीचा कोण स्व हितसाठी वापर करत आहेत हे तालुक्याच्या ध्यानात आले आहे.
पाटाला पाणी आल्यावर चार्‍या का फुटतात. धरणात पाणी असतांना तालुक्यातील शेतकर्‍यांना ते का मिळत नाही. चार्‍या दुरुस्तीसाठी आलेला 3 वर्षातील कोट्यावधीचा निधी कोणाच्या खिशात गेला, याचे गौडबंगाल काय? असा सवाल गडाख यांनी यावेळी उपस्थित केला. तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी पाण्याचे नियोजन करण्यापेक्षा आपलेच नियोजन करण्यात लोकप्रतिनिधी दंग आहे.
पाणी मागण्यासाठी गेलेल्या शेतकर्‍यांवर अमानुषपणे लाठी हल्ला केला. याचे पाप कुणाचे आहे. नेवासा कृषी खात्यातील भ्रष्टचार तर राज्यात गाजला असून विधानसभेत राज्यातील अन्य आमदारांनी तारांकित प्रश्न केला. यामुळे तालुक्यातील भ्रष्टाचारमागे कोणाचा हात आहे, हे सांगण्यासाठी आता जोतिषाची गरज राहिली नाही अशी टीका गडाख यांनी यावेळी केली.

 

LEAVE A REPLY

*