नाभिक समाजाचा मुकमोर्चा : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍यावर कठोर कारवाईची मागणी

0
अहमदनगर (प्रतिनिधी)- शेवगाव तालुक्यातील हातगाव येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या नराधमास कठोर शिक्षा व्हावी.या मागणीसाठी नगरसह राज्यभरातील हजारो नाभिक समाजाच्यावतीने गांधी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मुकमोर्चा काढण्यात आला.
या मोर्चामुळे शहरातील कापड बाजार, आडतेबाजार, गंजबाजार या भागातील वाहतूक विस्कळीत झाली. यावेळी मोर्चेकर्‍यांनी हातगावमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍यावर कठोर कारवाईची मागणी केली.
सोमवारी सकाळपासून मोर्चात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यासह राज्यातील विविध जिल्ह्यातून आलेले मोर्चेकरी शहरातील गांधी मैदान येथे एकत्र आले. 11 वाजेपर्यत मैदान गर्दीने फुलन गेले होते. दरम्यान समाजातील पाच मुलींनी विविध मागण्यासंदर्भात मनोगत व्यक्त केले.
मोर्चेकरी मुलीमध्ये मोहिनी कोरडे, स्वाती चौगुले, कोजागिरी राऊत, दिपाली शिंदे, नेहा शिंदे, जागृती सोनवणे, प्रियंका वाघमारे, कल्याणी क्षिरसागर आदींनी मोर्चापूर्वी गांधी मैदानातील सभेत आपल्या भावना तीव्र शब्दात व्यक्त केल्या.
यावेळी राज्यभरातून नाभिक समाज मोठ्या संख्याने समाज बांधव उपस्थितीत होते. मोर्चाला गांधी मैदान येथून सुरवात झाल्यानंतर मोर्चा लक्ष्मी कारंजा, चितळे रोड, नेता सुभाष चौक, नवी पेठ, भिंगारवाला चौक, कापडबाजार, पारशा खुंट व तेली खुंट मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
यावेळी राज्यातून आलेले मोर्चेकरी थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दाखल झाल्याने गर्दीत आणखी भर पडली. दरम्यान विविध मागण्यांचे निवेदन समाजाच्या पाच मुलींनी जिल्हाधिकार्‍यांना दिले. या प्रकरणात जातीने लक्ष घालून पिडीत कुंटुंबाला न्याय मिळून देण्यासाठी प्रयत्नशिल राहणार असल्याचे आश्‍वासन जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी मोर्चेकरी मुलींना दिले. नाभिक समाजातील एका शालेय मुलीवर अत्याचार करण्यात आला. अत्याचार करणार्‍यांच्या कुटुंबाकडून पीडित नाभिक समाजाच्या कुटुंबाला धमक्या दिल्या जात आहेत.
या घटनेचा निषेध करण्यासाठी नाभिक समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मूक मोर्चा काढण्यात आला होता. शेवगाव तालुक्यातील हातगाव येथे 27 जुलैला आरोपी संभाजी शिवाजी भराट यांने 14 वर्षीय नाभिक समाजाच्या शालेय मुलीवर अत्याचार केला. याप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतरचत्यास अटक केली.
मोर्चामध्ये पीडित कुटुंबांना आर्थिक मदत मिळावी, पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण मिळावे, त्यांचे पुनर्वसन करावे, पोलिसांनी याप्रकरणाचे दोषारोपपत्र तात्काळ दाखल करावे, या खटल्याचे काम पाहण्यासाठी ऍड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, पीडित कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी, आरोपीस कठोर शिक्षा व्हावी,आरोपीकडून कुटुंबीयांना वारंवार धमकी येत आहे.

त्यामुळे त्यांना पोलीस संरक्षण मिळावे, त्यांचे पुनर्वसन करावे, हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा अशा विविध मागण्या मोर्चाकर्‍यांच्या वतीने करण्यात आल्या आहेत.मोर्चा दरम्यान खा.दिलीप गांधी व आमदर संग्राम जगताप यांनी भेट देवून पाठींबा दिला.

गर्दीत रूग्णवाहिकेला वाट मोकळी –
जिल्हाधिकारी कार्यालयावर नाभिक समाजचा मोर्चा धडकला. दरम्यान सर्व मोर्चाकरी रस्त्यावर बसलेले होते. काही वेळात अचानक एक रूग्णावाहिका जिल्हाधिकारी रस्त्यावरून जात असतांना संयोजकांनी वेळेचे गांभिर्य लक्षात घेवून मोर्चाकर्‍यांना वाट मोकळी करण्याची विनंती करताच सर्वानी त्या रूग्णवाहिकेस तात्काळ रस्ता मोकाळा करून दिला. 

अ‍ॅड. निकम यांची नियुक्ती करा –
हातगाव येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ नाभिक वसमाज एकवटला आहे. आरोपीला कठोर शिक्षा होण्यासाठी प्रसिध्द सरकारी वकील ऍड.उज्वल निकम यांची खटला चालविण्यासाठी नियुक्ती करावी.
स्वाती चौघुले, कोल्हापूर.

खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवा –
यापूर्वी अनेक महिला नराधमांच्या अत्याचाराला बळी पडल्या आहेत.त्यामूळे सदर खटला जलतगती न्यायालयात चालवून लवकरात लवकर आरोपी शिक्षा करावी.त्यामूळे पुन्हा असे काही करण्याची कोणाची हिंमत होणार नाही.
जागृती सोनवने, जळगाव.


गांधी मैदान येथून मोर्चा निघाला असता.सर्वात पुढे समाजातील मुली व महिला काळे वस्त्र घालून जिल्हाधिकारी कार्यालयाची वाट धरली.यावेळी मोर्चाच्या अग्रभागी असलेली मशाल मोर्चाचे आकर्षण ठरले.दरम्यान विविध मागण्यांचे व वेगवगळ्या प्रकारचे फलकही सर्वाचे लक्ष वेधून घेत होते.

तिला वेगळ्या नजरेने पाहू नका – 
त्या अत्याचारीत ताईला वेगळ्या नजरेने न पाहता सर्व समाज तीला पुढील भविष्यातील जीवन जगण्यासाठी आधार देणार आहे. ती तीच्या आयुष्यात खुप काही करु शकते.
नेहा शिंदे, नगर

LEAVE A REPLY

*