चंद्रग्रहण दिसलेच नाही

0
अहमदनगर – वर्षातील अखेरचे खंडग्रास चंद्रग्रहण पाहण्याचा आनंद पावसाळी वातावरणामुळे नगरकरांना लुटता आला नाही. या ग्रहणाचा काळ 1 तास 96 मिनिटे इतका होता. या ग्रहणाचे वेध हे दुपारी एक वाजल्यापासून लागल्याने राखी पौर्णिमेचा सणही त्यापूर्वी साजरा करण्यात आला. हे ग्रहण रात्री 10 वाजून 52 मिनिटांनी सुरु झाले.
यावेळेला पृथ्वीची छाया चंद्रावर पडण्यास सुरवात होणार होती. त्यानंतर हळूहळू रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी पृथ्वी पूर्ण चंद्राच्या मध्ये येणार होती. रात्री 12 वाजून 48 मिनिटांनी हे ग्रहण सुटणार होते. ग्रहणाची उत्सुकता मोठी होती. पण पावसाळी वातावरणामुळे ढगांमुळे चंद्रग्रहणाचे दृश्य काही ठिकाणी दिसत होते. तेही स्पष्ट दिसत नव्हते. ग्रहणांच्या दिवशीच राखी पौर्णिमा असल्याने या सणावर ग्रहणाचे सावट होते.

LEAVE A REPLY

*