Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच नाशिक मुख्य बातम्या

उद्या चंद्र आणि गुरूची ‘पिधानयुती’….

Share

नाशिक | प्रतिनिधी 

२८ नोव्हेंबर,२०१९  रोजी सायंकाळी पश्चिम आकाशात आपल्या पृथ्वीचा  ‘चंद्र’ आणि  सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह असलेल्या ‘गुरु’ ची   ‘पिधानयुती’ पहायला मिळणार आहे.

ही एक अद्भुत आणि प्रेक्षणीय खगोलीय घटना असणार आहे.  आपल्याला  ग्रहण म्हणजे सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण इतकेच माहिती असते. परंतु पिधान युती  देखील  एक प्रकारचे ग्रहणच असते , ही पिधान युती  अनेकदा होते पण आपल्या भागातून दिसण्याचा हा योग खूप वर्षा  नंतर आला आहे.

jupi 5

ही पिधान युती महाराष्ट्रा सह उत्तर भारत, नेपाल व  तिबेट या भागातून पाहायला मिळणार आहे. यावेळेस गुरु ग्रहाची तेजस्विता हि उणे १.८४ असणार आहे. या ग्रहाच्या पूर्वेला तेजस्वी शुक्र ग्रह ही दिसणार आहे. या वेळी ग्रहाची तेजस्विता हि उणे ३.८७ एवढी असणार आहे. या वेळेस चंद्र , गुरु व शुक्र हे तीनही खगोलीय पिंड धनु राशीत असणार आहेत.

jupiter n moon occultation.jpg

सायंकाळी सूर्य मावळत असतांना चंद्राची द्वितेयेची कोर अतिशय विरळ दिसेल या वेळेस गुरु ग्रह चंद्राच्या सावली कडील भागातून सायंकाळी ०५:१० वाजता चंद्राच्या पाठीमागे लपण्यास सुरुवात करेल ही घटना  केवळ दुर्बिणी द्वारे पाहायला मिळेल .

occultation start.jpg

मात्र सायंकाळी ०६:१० वाजता चंद्राच्या प्रकाशित भागाच्या खालील भागातून गुरु ग्रह बाहेर पडेल तेंव्हा हा प्रसंग विलोभनीय असणार आहे.  या वेळेस अंधार असल्यामुळे हा  प्रसंग नुसत्या डोळ्यांनी देखील पाहायला मिळणार आहे

occultation end.jpg

जसा सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र आला की सूर्यग्रहण होते किंवा  सूर्य आणि चंद्र यांच्यात पृथ्वी आली की चंद्रग्रहण होते. तसेच  सूर्यमालेतील एखादा ग्रह  आणि पृथ्वी यांच्यात चंद्र आला की ग्रह ग्रहण  होते अर्थात पिधान युती होते..

या ग्रहणाला पिधानयुती (Occultation) असे म्हणतात. चंद्र ज्यावेळी एखाद्या तेजस्वी   तार्यासमोरून किवां ग्रहासमोरून जातो त्यावेळी तो तारा  किवां ग्रह चंद्राच्या मागे काही काळासाठी लुप्त किंवा दिसेनासा होतो, याला पिधान युती असे म्हणतात. तसे बघितले तर चंद्र रोज कोणत्या न कोणत्या तार्या सामोरून जातो, पण क्वचितप्रसंगी तो एखाद्या ग्रहासमोरून जातो आणि आपल्याला निसर्गाचा एक अदभूत आणि प्रेक्षणीय   चमत्कार पहायला मिळतो.

पूर्ण पिधानयुती (Total Occultation) व स्पर्शीय पिधानयुती (Grazing Occultation) असे पिधान युतीचे दोन प्रकार आहेत. पूर्ण पिधान युतीच्या वेळी ग्रह किवां तारा चंद्राच्या मागे पूर्णपणे झाकला जातो आणि ग्रहण सुटते तसे चंद्राच्या मागून हळूहळू बाहेर येताना दिसतो. हा काळ जवळजवळ एक तासाचा असतो.

स्पर्शीय पिधान युतीच्या वेळी ग्रह किवां तारा चंद्राच्या उत्तर किवां दक्षिण ध्रुवाला अलगद स्पर्श करतो. फक्त स्पर्श करत असल्याने हा काळ खूप छोटा असतो.

आपल्या शेजारील देश पाकिस्तान सह जगभरात अनेक देशाचे ध्वज चंद्रकोर व तेजस्वी तर असा दाखवलेला असतो. तशीच काही परिस्थिती उद्या सुरुवातीच्या काळात पाहायला मिळणार आहे.

दुर्बिणीतून बघा पिधानयुती…!

या पिधानयुतीचा अदभूत नजारा  दुर्बिणी व द्विनेत्री मधून  सायंकाळी ०५:०५ ते ०६:१५ यावेळेत एमजीएमच्या एपीजे  अब्दुल कलाम  खगोलअंतराळ विज्ञान केंद्र व क्लब ,औरंगाबाद च्या वतीने बघण्याची व्यवस्था केलेली आहे….

 श्रीनिवास औंधकर, संचालक

महात्मा गांधी मिशन,  एपीजे  अब्दुल कलाम  खगोलअंतराळ विज्ञान केंद्र व क्लब,

एमजीएम परिसर, औरंगाबाद (संपर्क : ९४२२१७१२५६)

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!