Tuesday, April 23, 2024
Homeमहाराष्ट्रमान्सून १ जून ऐवजी ५ जूनला केरळात दाखल होणार

मान्सून १ जून ऐवजी ५ जूनला केरळात दाखल होणार

पुणे (प्रतिनिधी) मान्सून आपल्या पूर्वनियोजित वेळेनुसार म्हणजेच एक जूनला केरळमध्ये दाखल होणार असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला होता. परंतु आता मान्सून यंदा चार दिवस उशिरा म्हणजे ५ जून रोजी दाखल होईल असा सुधारित अंदाज भारतीय हवामान खात्याने शुक्रवारी वर्तवला आहे.

पावसाच्या आगमनाच्या आणि परतीच्या सुधारित तारखांचा अहवाल विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. पाच जूनपासून देशात मान्सूनची सुरुवात होईल, असे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरवर्षी १ जूनला मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर ११ जूनपर्यंत मुंबईत पावासाची हजेरी लागते. पंरतु, यंदा पाच दिवस उशिराने मान्सून दाखल होणार असल्याने मुंबईकरांना आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

- Advertisement -

मान्सून सुरुवातीच्या तारखेनंतर चार दिवसांनी जूनपर्यंत दक्षिणेकडील राज्यात प्रवेश करण्याची जास्त शक्यता आहे. केरळमध्ये मान्सून सुरु झाल्याने देशात चार महिन्यांच्या पावसाळ्याची अधिकृत सुरुवात होते. बंगालच्या उपसागरात वादळाच्या चक्रीय स्थितीवर मान्सूनची स्थिती असते. साधारण १६ मेपर्यंत अथवा आधी मान्सून अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहात पोहोचण्याची शक्यता असल्याचे विभागाने यापूर्वीच सांगितले होते.

गेल्या काही वर्षांपासून मॉन्सूनच्या आगमन कालावधीमध्ये बदल झाला आहे. यामध्ये एक आठवड्याचे अंतर निर्माण झाले आहे. दक्षिण बंगालचा उपसागर दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटांवर मॉन्सूनचे आगमन होण्यास ही स्थिती निर्माण होणार आहे.

साधारण दीर्घकालीन वेळेनुसार मॉन्सून २० मे पर्यंत अंदमान – निकोबार बेटांवर दाखल होऊन बहुतांशी भाग व्यापतो. मागील वर्षी १८ मे रोजी मॉन्सून दक्षिण अंदमानात दाखल झाला होता. तर संपूर्ण अंदमान बेटे व्यापण्यास ३० मे पर्यंत वाट पाहावी लागली होती. तसेच यावर्षी नैॠत्य मोसमी वाऱ्याच्या (मॉन्सुन) हंगामात जुन ते सप्टेंबर या कालावधीत यंदा शंभर टक्के पाऊस पडण्याचा अंदाज विभागाने यापूर्वी जाहीर केला आहे. त्यात पाच टक्के कमी अधिक पाऊस पडण्याची शक्यता गृहित धरण्यात आली आहे.

दरम्यान, १५ मे नंतर दिशातील अनेक भागांमध्ये तापमानात वाढ होणार आहे, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. संपूर्ण उत्तर भारतात उष्ण हवेचा सामना करावा लागेल. उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान तसेच गुजरातमधील पारा वेगाने वाढू शकतो. दरम्यान मध्यंतरी ढगाळ वातारवणामुळे तापमानात घट नोंदवली जावू शकतो. सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी देखील मान्सूनची प्रतीक्षा करीत आहे. हवामान विभागानूसार पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेशसह दिल्ली तसेच राजस्थानमध्ये धुळीचे वारे सुरु आहेत. अनेक ठिकाणी सौम्य पावसाची नोंद करण्यात आल्याने तापमानात घट नोंदवण्यात आली आहे.

परतीच्या प्रवासातही बदल

मान्सूनच्या परतीच्या प्रवासातही बदल होईल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. परतीच्या पावसाची तारीख १५ ऑॉक्टोबरच ठेवण्यात आली आहे. म्हणजे १५ ऑक्टोबर रोजी मान्सून संपुर्ण देशातून माघार घेईल. यात काही बदल करण्यात आलेला नाही. मान्सून मुंबईत दाखल होण्याची तारीख १० जून होती. आता ती ११ जून आहे. मान्सून मुंबईतून ८ ऑक्टोबर रोजी आपला परतीचा प्रवास सुरु करेल. परतीच्या पावसाची यापूवीर्ची तारीख २९ सप्टेंबर होती.

यावर्षी केरळच्या किनारपट्टीवर येण्यास नैॠत्य मॉन्सूनला मागील वर्षीच्या तुलनेत थोडा विलंब झाला आहे. यावेळी तो पाच जुनच्या वेळी दाखल होण्याची शक्यता आहे.गेल्या काही वर्षांपासून मॉन्सूनच्या आगमन कालावधीमध्ये बदल झाला आहे. यामध्ये एक आठवड्याचे अंतर निर्माण झाले आहे. दक्षिण बंगालचा उपसागर दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटांवर मॉन्सूनचे आगमन होण्यास ही स्थिती निर्माण होणार आहे.

साधारण दीर्घकालीन वेळेनुसार मॉन्सून 20 मे पर्यंत अंदमान – निकोबार बेटांवर दाखल होऊन बहुतांशी भाग व्यापतो. मागील वर्षी 18 मे रोजी मॉन्सून दक्षिण अंदमानात दाखल झाला होता. तर संपूर्ण अंदमान बेटे व्यापण्यास 30 मे पर्यंत वाट पाहावी लागली होती. तसेच यावर्षी नैॠत्य मोसमी वाऱ्याच्या (मॉन्सुन) हंगामात जुन ते सप्टेंबर या कालावधीत यंदा शंभर टक्के पाऊस पडण्याचा अंदाज विभागाने यापूर्वी जाहीर केला आहे. त्यात पाच टक्के कमी अधिक पाऊस पडण्याची शक्यता गृहित धरण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या