Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात मॉन्सूनचे पुनरागमन, मराठवाड्यात जोरदार पाऊस

राज्यात मॉन्सूनचे पुनरागमन, मराठवाड्यात जोरदार पाऊस

मुंबई :

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने महाराष्ट्रात (maharashtra) पुढील ३ दिवस जोरदार पावसाची (rain)शक्यता वर्तवलेला होती. हवामान विभागाचा (monsoon)हा अंदाज खरा ठरला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळला. अनेक नदी नाल्यांना पूर आला आहे. जळगाव, धुळ्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

- Advertisement -

पुढील तीन दिवस मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मुसळधार (rain) पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून (whether department )देण्यात आला आहे. राज्यात पुढील दोन ते तीन दिवसात बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने कालच याबाबतचा इशारा दिला आहे. विशेषत: मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर वाढणार असून, पुण्यातही आगामी तीन दिवसांमध्ये जोरदार पावसाची शक्‍यता आहे. सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असून, त्याच्या प्रभावामुळे राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण आहे. दरम्यान पुणे शहर परिसरासाठी आज पावसाचा यलो तर उद्या ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.

17 ऑगस्टला यलो अ‌ॅलर्ट

हवामान विभागानं(monsoon) 17 ऑगस्टला राज्याच्या विविध भागात पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

18 ऑगस्टला कोकण ते विदर्भात पाऊस

कोल्हापूर सातारा, पुणे, नाशिक, औरंगाबाद, जालना आणि यवतमाळ जिल्ह्याला ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आलाय. तर, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, सांगली, बीड, उस्मानाबाद, चंद्रपूर, वर्धा, लातूर, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्याला यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

अफगाणिस्तानची सत्ता हस्तगस्त करणारे तालिबान आहे तरी काय?

- Advertisment -

ताज्या बातम्या