पावसाळ्यात तोंडाला पाणी आणतील या चटपटीत वड्या

0

वाफाळलेला चहा आणि भजी हे पदार्थ जसे पावसाळ्यात हवेहवेसे वाटतात, तसेच या वड्यांचाही आस्वाद जरूर घ्या. पावसाचा आनंद नक्कीच वाढेल.

पालक टोमॅटो वडी

साहित्य – पालक दोन जुडी , चार टोमॅटो , तीन वाट्या जाड पोहे , एक चमचा जीरेपूड , ओवा पूड , १/१ चमचा हळद , मीठ , हिंग.

कृती – पोहे भिजवून पाण्यात ठेवा नंतर थोड्या वेळानी निथळून पाणी काढून टाका. त्यात पालक, टोमॅटो घालून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.  मीठ, जिरेपूड, हिंग, मिरची वाटलेली घाला. सर्व मिसळून वडया थापा आणि पातळ चौकोनी वाळवून ठेवा आणि पाहिजे तेव्हा तळा.

खोबऱ्याच्या खुसख़ुशीत वड्या

साहित्य – २ वाट्या नारळाचा चव, दीड वाटी साखर, एक मध्यम उकडलेला बटाटा, १ चमचा वेलची पावडर.

कृती – खोबर-साखर एकत्र करून मंद आचेवर ठेवा. बटाटा किसून घ्यावा. खोबऱ्याचा गोळा होत आल्यावर बटाटा आणि वेलची पावडर मिसळावी. ताटाला तूप लावून वड्या थापव्यात. बटाटयामुळे वड्या खुसख़ुशीत व शुभ्र होतात.

पाटवड्या

साहित्य -दोन वाटी बेसन पीठ , अर्धी वाटी किसलेले सुखे खोबरे , अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर, एक चमचा खसखस एक छोटा चमचा कांदा- लसूण मसाला, मीठ ,दोन चमचे तेल.

कृती – तेलाची फोडणी द्या, अर्धी फोडणी वाटीत काढून घ्या आणि उरलेल्या फोडणीत दोन वाट्या पाणी घाला. पाण्याला उकळी आणा नंतर बेसन पीठ, मीठ एकत्र करून घ्या व उकळलेल्या पाण्यात बेसनपीठ घालून पळीने घोटून घ्या.

पिठाच्या गुठल्या मोडून घेउन नंतर झाकण ठेऊन दणदणीत वाफ आणा.ताटाला तेल लावून ताटात पीठ थापावे. एक चमचा तेल कढत करून त्यात खोबर, कोथिंबीर , खसखस, काळा मसाला, मीठ घालून लालसर परतावे. ताटात थापलेल्या पीठावर हा मसाला पसरावा व शंकरपाळीच्या आकाराच्या मोठया वड्या कापा.

LEAVE A REPLY

*