Type to search

६ जूनला मान्सून केरळमध्ये; राज्यातले आगमन लांबणीवर

Breaking News Featured maharashtra देश विदेश मुख्य बातम्या

६ जूनला मान्सून केरळमध्ये; राज्यातले आगमन लांबणीवर

Share

मुंबई | प्रतिनिधी

सध्या भीषण दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. यातच आज हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार यंदाचा मान्सून ६ जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.  त्यामुळे सात जूनला येणारा मान्सून यंदा महाराष्ट्रात लांबणीवर पडला आहे.

गेल्या दोन वर्षांपासून दुष्काळाच्या व्यथा भोगत असलेल्या भारतातील शेतकऱ्यांना यंदा मान्सूनबाबत दिलासादायक माहिती देण्यात आली आहे. हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, यावर्षी मान्सून ६ जून रोजी केरळमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मान्सूनचे आगमन लांबण्याची शक्यता आहे.

दरम्यान, स्कायमेटकडून दोन दिवस आधी म्हणजेच ४ जूनला मान्सून केरळच्या समुद्रकिनाऱ्यावर धडकेल असा अंदाज देण्यात आला होता.

त्यानंतर आज हवामान खात्याने मान्सूनबाबत माहिती दिली आहे. केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाल्यानंतर सहा ते सात दिवसांनी महाराष्ट्रात मान्सून दाखल होतो. त्यामुळे यंदा महाराष्ट्रातील मान्सूनचे आगमन जवळपास एक आठवडा लांबणीवर पडला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!