मोहम्मद शमी प्रकरणात महेंद्रसिंग धोनीची उडी

0
शमी चांगला माणूस, मी त्याच्या पाठीशी – धोनी
मुंबई : अनैतिक संबंधाच्या आरोपामुळे चर्चेत असलेला खेळाडू मोहम्मद शमी प्रकरणात महेंद्रसिंग धोनीने उडी मारली आहे. पत्नीच्या आरोपांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेला जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीच्या पाठीशी माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी उभा राहिला आहे. शमी एक चांगला माणूस आहे, अशा व्यक्ती पत्नी आणि देशाला कधीच धोका देऊ शकत नाहीत, अशा शब्दात धोनीने आपला पाठिंबा दर्शवला आहे.

‘हे एक कौटुंबिक प्रकरण आहे आणि शमीच्या वैयक्तिक आयुष्याशी निगडीत आहे. माझ्या माहितीनुसार शमी एका चांगला माणूस आहे’ असं म्हणत धोनीने शमीबाबत फारसं बोलण्यास नकार दिला. टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू चेतन चौहाननेही शमीचं समर्थन केलं होतं. ‘बीसीसीआयने मोहम्मद शमीचा करार थांबवता कामा नये. या प्रकरणाचा क्रिकेटशी काहीही संबंध नाही आणि तो अद्याप दोषी सिद्ध झालेला नाही’ असं चौहानने म्हटलं होतं.

LEAVE A REPLY

*