Type to search

maharashtra देश विदेश मुख्य बातम्या

जनता जनार्दन ईश्‍वराचं रूप!

Share

मोदींकडून सरकार स्थापनेचा दावा । ‘सबका विकास’ हाच सरकारचा मंत्र

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शनिवारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) संसदीय दलाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रपतींना भेटून सरकार स्थापनेचा दावा केला. राष्ट्रपतींनी मला सरकार स्थापन करायला सांगितले असून काळजीवाहू पंतप्रधान म्हणून नियुक्त केले आहे, असे मोदींनी राष्ट्रपतींच्या भेटीनंतर सांगितले. तत्पूर्वी एनडीएच्या खासदारांशी संवाद साधताना ते म्हणाले, जनता जनार्दन ईश्वराचं रूप असतं असं सांगत ज्यांनी आपल्यावर विश्वास दाखविला व ज्यांचा विश्वास मिळवायचाय अशा दोघांसाठी काम करणार आहे. दरम्यान, नव्या मोदी सरकारचा 30 मे रोजी शपथविधी होणार असल्याचे वृत्त आहे.

राष्ट्रपतींनी मोदींना मंत्रिमंडळातील अन्य सदस्यांची नावे आणि राष्ट्रपती भवनातील शपथविधीची तारीख आणि वेळ कळवायला सांगितली आहे. त्यानुसार 30 मे रोजी शपथविधी असल्याचे वृत्त आहे. देशाने मला मोठा जनादेश दिले आहे आणि जनादेशसोबत लोकांच्या अपेक्षाही असतात. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास हा माझ्या सरकारचा मंत्र असून हा मंत्रच भारताच्या प्रत्येक भागामध्ये विकासाचा मार्ग दाखवेल. मी पुन्हा एकदा देशातील जनतेचे आभार मानतो. नवे सरकार लोकांची स्वप्ने, अपेक्षा पूर्ण करण्यासाठी काम करेल असे आश्वासन देतो, असे मोदी यांनी राष्ट्रपती भवनाबाहेर प्रसारमाध्यमांनी बोलताना सांगितले.

अमेरिकेच्या अध्यक्षांच्या मतांएवढी वाढ
अमेरिकेच्या अध्यक्षाला जेवढी मतं मिळाली तेवढी तर आपल्या मतांमध्ये 2019 मध्ये वाढ झाली, असं सांगत नरेंद्र मोदींनी भारताच्या विशालतेचं वर्णन केलं आहे. मोदींची भाजपच्या प्रमुखपदी निवड झाल्यानंतर भाजपच्या खासदारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी महिलांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केलं असून नारीशक्तीचे आभार मानले. भारताच्या इतिहासात प्रथमच इतक्या महिला खासदार असल्याचं ते म्हणाले. नरेंद्र मोदींनी 2014 मध्ये केलेले सगळे रेकॉर्ड नरेंद्र मोदींनीच 2019 मध्ये तोडले असं त्यांनी सांगितले. आघाडीचे राजकारण महत्त्वाचं असल्याचं सांगताना ही वाजपेयींची देणगी असल्याचे ते म्हणाले. सभागृहातील वाजपेयींचे छायाचित्र आपल्याला आशीर्वाद देत असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपाचा प्रयोग आणखी यशस्वी करायचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!