Type to search

नंदुरबार

मुलाला मोहरा बनवून घरात भांडण लावण्याचा आपसातील व पक्षातील कार्यकर्त्यांचा डाव: आ.उदेसिंग पाडवी

Share

मोदलपाडा । वार्ताहर- ऐन निवडणुकीच्या कालावधीत माझ्या पुत्राला मोहरा बनवून पक्षातील काही कार्यकर्ते व आपसातील लोकांनी माझ्याविरुद्ध षडयंत्र रचण्याचा डाव आखला असून माझ्या घरात भांडण लावण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. मात्र, त्याला आपण फारसे महत्व देत नाही, अशी माहिती आ.उदेसिंग पाडवी यांनी देशदूतशी बोलतांना दिली.

मुंबई येथे पोलीस निरिक्षक म्हणून कार्यरत असलेले व आ.उदेसिंग पाडवी यांचे सुपूत्र राजेश उदेसिंग पाडवी यांना भाजपाकडून शहादा-तळोदा विधानसभा मतदार संघाची उमेदवारी मिळावी, अशी मागणी तळोदा येथील कलावधी फाऊंडेशनने भाजपाच्या प्रदेश कार्यालयाशी संपर्क साधून केली आहे. फाऊंडेशनचे उपाध्यक्ष विरसिंग पाडवी, सचिव निलेश वळवी, प्रवीण वळवी यांनी शहादा येथील पत्रकारांशी बोलतांना ही माहिती दिली.याबाबत आ.उदेसिंग पाडवी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले,

माझ्या पुत्राच्या उमेदवारीसाठी गावातील तसेच पक्षातील काही कार्यकर्त्यांनी लॉबिंग सुरू केले आहे. आपसातील व पक्षातील काही लोक माझ्या मुलाला मोहरा बनवून मला त्रास देण्यासाठी षडयंत्र रचत आहेत. ते मला थेट विरोध करू शकत नाही, म्हणून माझ्या घरात भांडणे लावायचा उद्योग त्यांनी सुरू केला आहे. परतू याव्दारे ते पक्षाच्या विरोधात बंडखोरी करीत आहेत हे ते विसरत आहेत.अजून दहा ते पंधरा वर्ष मी सक्षमपणे समाजकारण व राजकारण करू शकतो आणि योग्यवेळी मी माझा राजकीय उत्तराधिकरी जाहीर करेन. नको ते वाद उद्भवून ऐन निवणुकांच्या तोंडावर माझी मानसिकता खराब करण्यासाठी व निरर्थक गोष्टीत मी गुंतून रहावे, यासाठी विरोधकानी केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे. त्याला महत्व देण्याचे कोणतेही कारण नाही,असेही ते म्हणाले.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!