Type to search

नंदुरबार

अक्कलकुवा तालुक्यातील 9 जि.प. शाळा अनेक दिवसांपासून बंद

Share

चेतन इंगळे
मोदलपाडा, ता.तळोदा – अक्कलकुवा तालुक्यातील 9 जिल्हा परिषद शाळा अनेक दिवसांपासून बंद आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत आदिवासी एकता परिषदेचे युवाध्यक्ष अ‍ॅड.कैलास वसावे यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले असून संबंधित शिक्षकांवर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे, अक्कलकुवा तालुक्यातील सरी (पाटीलपाडा) पाटलागव्हाण (मोगरा), ओघाणी, ओघाणी, कटासखाई, ओहवा, लिंबीपाडा (ओहवा), खाई, सावरखाडी (खाई) अश्या 9 शाळांना वसावे यांनी भेट दिली होती. त्यात या सर्व शाळा बंद आढळून आल्या आहेत. याबाबत तेथील गावकर्‍यांच्या तक्रारीवरून या सर्व शाळांना भेट दिली. या भेटी दरम्यान तब्बल 9 जि.प.शाळा बंद आढळून आल्या. ज्यात एकही शिक्षक अथवा विद्यार्थी आढळून आले नाही. ही अतिशय निंदनिय व खेदजनक बाब आहे या बंद असलेल्या शाळेतील शिक्षकांवर निलंबन करुन कडक कारवाई करण्यात यावी. शाळा नियमितपणे सुरू न झाल्यास आदिवासी समाज व संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

या गावातील लोक तक्रार करून थकून गेले, पण संबंधित प्रशासन लक्ष द्यायला तयार नाहीत. या शाळेतील शिक्षक आठ दिवसातून एकदाच शाळेत येतात व आठदिवसांच्या सह्या करून निघून जातात असे येथील गावकर्‍यांचे म्हणणे आहे. निवेदनावर अ‍ॅड. कैलास वसावे, अ‍ॅड.गजमल वसावे, जितेंद्र वसावे, अ‍ॅड. संदिप ठाकरे, वसंत पाडवी, मंगलसिंग वसावे, अ‍ॅड.अनिल वळवी यांच्या सह्या आहेत.

जिल्हा परिषद शाळा चालत नसल्याच्या तक्रारी होत्या. जेव्हा शाळेवर भेट दिली तेव्हा शाळेवर ना विद्यार्थी आढळले ना शिक्षक. फक्त खिचडी देण्यापुरत्या या शाळा चालतात हे भयानक वास्तव शाळाभेटीतून आले. शाळा नियमित चालाव्या यासाठी प्रशासन व गावकर्‍यांनी शिक्षकांवर वचक ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!