‘व्हॅलेंन्टाईन डे’च्या पार्श्वभुमीवर पोलिसांची विशेष पथके नियुक्त करा

0
मोदलपाडा । वार्ताहर – ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी पोलीसांची विशेष पथके नियुक्त करणे, महाविद्यालय परिसरात गस्त वाढविणे, वेगाने वाहन चालविणार्‍यांवर कारवाई करणे आदी विषयीचे निवेदन तळोदा शहरातील जय श्रीराम ग्रुपतर्फे पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही वर्षात 14 फेब्रुबारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा करण्याची पाश्चात्यांची कुप्रथा भारतातही रुढ झाली आहे. पाश्चात्यांनी व्यावसायीक लाभासाठी प्रेमाच्या नावाखाली मांडलेल्या विकृत संकल्पनेमुळे युवापिढी भोगवाद अन् अनैतिकता गर्तेत ओढली जात आहे, व्हॅलेंटाईनच्या पार्श्वभूमीवर प्रेमाचे बिभत्स सादरीकरण करण्याच्या नावाखाली हल्ली एकतर्फी प्रेमातुन मुलींची छेडछाड आणि हिंसक कृत्ये घडले आहेत. यादिवशी होणार्‍या मेजवान्यांमधुन युवक-युवती यांच्यात मद्यपान, धुम्रपान, अंमली पदार्थांचे सेवन आदी अपप्रकारात प्रचंड वाढ झाली आहे. इतकेच नव्हे, तर या दिवशी मुलींवर प्रभाव पाडण्यासाठी भरगाव वेगाने वाहने चालवल्याने अपघातही होतात.

थोडक्यात व्हॅलेंटाईन डे मुळे शाळा-महाविद्यालयाच्या परिसरातील कायदा आणि सुव्यवस्था, तसेच शैक्षणिक वातावरण बिघडवणारी स्वैराचारी आणि चंगळवादी वृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे. याचा अतिरिक्त ताण पोलीस आणि प्रशासन यांच्यावर येत आहे. नुकतीच 23 जानेवारी 2019 ला सोरापाडा ता.अक्कलकुवा येथे घडलेली बलात्काराची घटना, तसेच महिलांवरील अत्याचारांची प्रकरणे ही सध्याची समाजाची ढासळलेली मानसिकता आणि कायदा सुव्यवस्थेची दु:स्थिती दर्शवतात. यामुळे अशा प्रकरणांची पुरावृत्ती टाळण्यासाठी व्हॅलेंटाईन डे च्या नावाखाली होणार्‍या अपप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांची विशेष पथके नियुक्त करावीत, शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात अपप्रकार करणार्‍या युवकांना कह्यात घ्यावे, महाविद्यालय परिसरात गस्त वाढवावी, मुलींची छेडछाड करणार्‍या युवकांवर कारवाई करावी, वेगाने आणि मद्यपान करुन वाहने चालविणार्‍यांचर कारवाई करावी आदी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदनावर अध्यक्ष सागर भोई, सचिव युवराज चौधरी, उपाध्यक्ष अमन जोहरी, खजिनदार कार्तिक शिंदे, दिपक चौधरी, किरण ठाकरे, कल्पेश जोहरी, कृष्णा सोनार, दिपेश जैन, सौरभ कलाल, सचिन भोई, रोहित रामोळे, निलेश जोहरी, पराग राणे, चिंतामण जोहरी, योगेश चव्हाण आदींच्या सह्या आहेत.

व्हॅलेंटाईन डे साजरा करणे, म्हणजे पाश्चात्त्यांच्या नितीहीनतेचे अनुकरण अन् हिंदु संस्कृतीचे अवमूल्यन होय. पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण करून आपण आपली संस्कृती सोडत आहोत. सनातन हिंदु धर्मातील सण हे नैतिकता आणि सदाचार शिकवतात तर पाश्चात्त्य प्रथा अनैतिकता आणि अनाचार शिकवतात. व्हॅलेंटाईन डे ऐवजी 14 फेब्रुवारीला मातृ-पितृ पुजन दिवस साजरा करावा. मात्र मातृ-पितृ पूजन दिनासारख्या उपक्रमातून आपल्या माता-पित्यांना सौजन्य आणि सन्मान देण्याची भावना वाढीस येईल.
– युवराज चौधरी,
सचिव, जय श्रीराम सोशल ग्रुप

LEAVE A REPLY

*