Type to search

नंदुरबार

स्वस्त धान्य दुकानातील दाळींचा भाव वाढल्याने ग्राहकांना फटका

Share

मोड ता. तळोदा । वार्ताहर I स्वस्त धान्य दुकानातील तुवर दाळ ,चनादाळ मे महिन्यापासुन दरवाढ करण्यात आली आहे.त्यामुळे ग्राहकांना याचा फटका बसणार आहे.

स्वस्त धान्य दुकानात तुवरदाळ पूर्वी प्रतिकिलो 35 रू दर होता.त्यात नविन दरानुसार 20 दर वाढ होऊन आता शिधा पत्रिका धारकाला 55 रू दयावे लागत आहे. तर चनादाळचा दरात 5 रू दरवाढ होऊन चनादाळ चे नविन दर 45रू दराने खरेदी करावी लागत आहे . पूर्वीचे दर 40 रू दर होता शासनाची दरवाढ अचानक लागू झाल्याने शिधापत्रिका धारकाना आर्थिक झळ पोहचली आहे. गोरगरीबाना शिधापत्रिकावर मिळणार्‍या जिवनावश्यक वस्तुचे दर स्थिर राहत असल्याने शासनाचा रास्त भावाने मिळणार्‍या गहू ,तांदूळ साखर , चनादाळ, तुवरदाळ,या वस्तु पैकी साखर, चनादाळ, तुवर दाळ महागल्याने शिधापत्रिका धारकांना मासिक खर्चाची जुळवाजुऴव करावी लागत आहे.अचानक दाळवर्गिय धान्यात दरवाढ झाल्याने शिधापत्रिका धारकांमधे शासनाचा निर्णयाने नाराजीचा सुर आहे तसेच अंत्योदय शिधापत्रिका धारकाना दर व्यक्ती 500 गॅ्रम मिळणारी साखरही कमी करून प्रति शिधापत्रिकेवर एक किलो केल्यामुळे नाराजी आहे. तसेच बीपील शिधापत्रिकाधारक लाभार्थिची साखर बंद झाल्याने महागडी साखर खावी लागत आहे.

तरी बीपिल शिधापत्रिका धारकाची बंद केलेली साखर पुन्हा उपलब्ध करण्याची मागणी शिधापत्रिकाधारकाची आहे तरी दुष्काळात होरपळणारा शिधापत्रिका धारकांवर लादलेली दरवाढ कमी करून दिलासा दयावा अशी मागणी होत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!