Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

जेव्हा दरोडेखोर सराफी दुकानात घुसतात…!

Share

नाशिकरोड । प्रतिनिधी

नाशिक-पुणे महामार्गावरील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या दत्तमंदिर चौकातील गोविंद दंडे अ‍ॅण्ड सन्स या सराफी दुकानात हेल्मेट परिधान केलेले दोघे दरोडेखोरांनी रिव्हॉल्वर घेऊन कर्मचार्‍यांना धमकावत दागिने लुटले.

सकाळच्या वेळी घडलेल्या या अनपेक्षित प्रकारामुळे दुकानातील कर्मचार्‍यांची पाचावर धारण बसली. दुकानाबाहेर नागरिकांचीसुद्धा मोठी गर्दी जमली. मात्र काही वेळातच हे मॉकड्रील असल्याचे समजल्यानंतर सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.

काल सकाळी 11 वाजेच्या सुमारास उपनगर पोलीस स्टेशन हद्दीतील दत्तमंदिर चौकातील गोविंद दंडे अ‍ॅण्ड सन्स या सराफी दुकानात दोघे दरोडेखोर बंदूक घेऊन आत घुसले. कर्मचार्‍यांना हॅण्डसप करत त्यांनी दागिने लुटले. या दरम्यान दुकानाचे संचालक अनिल दंडे व काही कर्मचार्‍यांनी प्रसंगावधान राखत नागरी सुरक्षा यंत्रणेला माहिती दिली.

त्यानंतर सदर यंत्रणेच्या माध्यमातून पोलीस, व्यापारी, कामगार व नागरिकांना याबाबतची माहिती देण्यात आली. ही माहिती मिळताच तातडीने सहाय्यक पोलीस आयुक्त ईश्वर वसावे, उपनगर पोलीस ठाण्याचे वपोनि भारतकुमार सुर्यवंशी व पोलीसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली. 10-15 मिनिटांतच दरोडेखोरांनी लुटलेला मुद्देमाल घेऊन दुकानाबाहेर पडत असताना पोलीसांनी त्यांच्या मुसक्या आवळून जेरबंद केले.

मात्र यानंतर नागरी सुरक्षा यंत्रणेचे संचालक डी.के. गोर्डे यांनी सदर प्रकार मॉकड्रील असल्याचे सांगितले व नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. एखाद्या सराफी दुकानात दरोडा पडल्यानंतर काय उपाययोजना करावी, याबाबत नागरिक व कर्मचार्‍यांना मार्गदर्शन करण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!