वनप्लस ६ नव्याला रंगात भारतात दाखल

0
मुंबई : वनप्लस सिक्स मे महिन्यात भारतात लॉन्च करण्यात आला होता. कंपनीने ८ जीबी रॅम व २५६ जीबी स्टोरेजचे लिमिटेड एडिशन व्हर्जन सादर केले होते. त्याला मिळालेली लोकप्रियता लक्षात घेऊन या फोन पेक्षा १ हजार रु. स्वस्त असे नवे व्हेरीयंट कंपनीने भारतात लाँच केले आहे. मिडनाईट ब्लॅक रंगातील हे व्हेरीयंत येत्या १० जुलै पासून अमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध होत आहे. या फोनची किंमत आहे ४३ हजार ९९९ रुपये असणार आहे.

या मॉडेलचा टॉप एंड व्हेरीयंट मिडनाईट ब्लॅक रंगात १४ जुलैपासून वनप्लस डॉट इन तसेच देशभरातील वनप्लस ऑफलाईन स्टोर्स मध्ये मिळू शकणार आहे. या फोनची डिस्प्ले साईज ६.१८ इंची एवढी असून फुल एचडी स्क्रीन आहे. तसेच स्क्रिनला गोरील्ला ग्लास ५ प्रोटेक्शन देण्यात आले आहे. व्हर्टीकल डूअल रिअर कॅमेरा असून हे कॅमेरे १६ आणि २० एमपीचे आहेत. डूअल एलईडी फ्लॅश दिला गेला असून फ्रंट कॅमेरा १६ मेगापिक्सल आहे.

LEAVE A REPLY

*