Type to search

Mobile Gadgets : रेडमीचा हा फोन खरेदी करा केवळ ४ हजार ४९९ मध्ये…

टेक्नोदूत मार्केट बझ मुख्य बातम्या

Mobile Gadgets : रेडमीचा हा फोन खरेदी करा केवळ ४ हजार ४९९ मध्ये…

Share
नवी दिल्ली : शाओमीने सर्वात स्वस्त स्मार्टफोन असलेला ‘रेडमी गो’ हा स्मार्टफोन दिल्लीत लाँच केला आहे. ‘रेडमी गो’ चीनमध्ये आधीच लाँच करण्यात आलेला आहे. शाओमीचा हा अँड्रॉयड गो स्मार्टफोन आहे.
चीनमध्ये लाँच करण्यात आलेल्या या फोनमध्ये १ जीबी रॅम ८ जीबी इंटरनल स्टोरेजसह स्नॅपड्रॅगन ४२५ प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच ८ मेगापिक्सलचा रिअर आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

हा फोन फिलिपिन्समध्ये आधीच लाँच करण्यात आलेला आहे. रेडमी गोची किंमत केवळ ४ हजार ४९९ रुपये इतकी आहे. या फोनची विक्री २२ मार्चपासून फ्लिपकार्ट, एमआय होम आणि एमआय या स्टोरमधून दुपारी १२ वाजेपासून सुरू होणार आहे. शाओमीचा हा आतापर्यंतचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे, असा कंपनीने दावा केला आहे.

#Redmi Go फिचर्स
* ५ इंचाचा एचडी डिस्प्ले
* १ जीबी रॅम आणि ८ जीबी स्टोरेज
* १६ जीबी, ३२ जीबीचा पर्याय
* ८ मेगापिक्सलचा कॅमेरा, सेल्फीसाठी ५ मेगापिक्सलचा कॅमेरा
* स्नॅपड्रॅगन ४२५ एसओसी प्रोसेसर
* ३००० एमएएच क्षमतेची बॅटरी
* ड्युअल सीम, वायफाय, मायक्रो यूएसबी

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!