Type to search

Mobile Gadatue : 5 एप्रिलला बाजारात येणार सॅमसंगचा पहिला 5G स्मार्टफोन

टेक्नोदूत मार्केट बझ मुख्य बातम्या

Mobile Gadatue : 5 एप्रिलला बाजारात येणार सॅमसंगचा पहिला 5G स्मार्टफोन

Share
सियोल : सॅमसंग लवकरच आपला पहिला 5G स्मार्टफोन बाजारात आणणार आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात दक्षिण कोरियामध्ये सॅमसंग हा 5G स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. कोणत्याही प्री बुकिंगशिवाय गॅलेक्सी एस-10 5G हा स्मार्टफोन 5 एप्रिलपासून ग्राहकांसाठी विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

या फोनबाबत ग्राहकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. परंतु सॅमसंगने या फोनची किंमत अद्याप जाहीर केलेली नाही. पण कोरियन बाजारात या फोनची किंमत 15 लाख वॉन (1332 डॉलर) असू शकते. बोलले जात आहे कि गॅलेक्सी एस-10 एक्स सॅमसंग गॅलेक्सी एस-10 सीरीजचा सर्वात एडवांस आणि सर्वात महाग स्मार्टफोन असेल. भारतीय बाजारात या फोनची किंमत अंदाजे 91 हजार 400 रुपये असू शकते.

सॅमसंग गॅलेक्सी एस-10 एक्स बद्दल बोलायचे तर हा फोन गॅलेक्सी एस-10 सीरीजचा एकमात्र 5जी सपोर्ट असलेला फोन असेल. हा फोन वेगवेगळ्या मार्केट्स मध्ये गॅलेक्सी एस-10 एक्सपीरियंस किंवा गॅलेक्सी एस-10 एक्सपान्ड नावाने येऊ शकतो.

पण गॅलेक्सी एस-10 5G मॉडेल पडताळणी चाचणीत पास झालं आहे आणि दक्षिण कोरियाच्या बाजारात आणण्यासाठी हिरवा कंदील मिळाला आहे. पण भारतीय बाजारात हा फोन कधी दाखल होणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

फोनची वैशिष्ट्ये
6.7 इंच डिस्प्ले
3D डेप्थ कॅमेरा
ट्रिपल कॅमेरा सिस्टम
4500 mAh बॅटरी
अल्ट्रासॉनिक फिंगरप्रिंट स्कॅनर
वायरलेस पॉवरशेअर

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!