Type to search

Breaking News Featured देश विदेश मुख्य बातम्या

मोबाईलचा डेटा होणार अधिक सुरक्षित; आयएमईआय कोड जोडणार सरकारी वेब पोर्टलला

Share
नाशिक । प्रतिनिधी
स्मार्टफोनच्या युनिक (आयएमईआय) कोडची माहिती केंद्र सरकारच्या वेब पोर्टलवर उपलब्ध करून देण्याच्या सूचना महिती व प्रसारण मंत्रालयाने स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांना दिले आहे. येत्या दोन महिन्यात हि माहिती सरकारला सांगण्यात यावी असा आदेशच या कंपन्यांना देण्यात आला आहे.
या युनिक कोडच्या माध्यमातून ग्राहकांचा डेटा सुरक्षित ठेवण्यात येईल अशी माहिती सरकारच्या वतीने सांगण्यात आली. या निर्णयाला स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांनी देखील सहमती दर्शवली आहे. स्मार्टफोनचा युनिक कोड १५ अंकांचा असतो. त्यालाच  इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी (आयएमईआय) नंबर असे म्हटले जाते.या नंबरच्या आधारे जीएसएम तंत्रज्ञानाद्वारे फोनचा युनिक कोड निश्चित करण्यात येतो.
सरकारने एका वेब पोर्टलची नुकतीच सुरुवात केली आहे. या पोर्टलच्या आधारे आपला हरवलेला मोबाईल फोन शोधण्यासाठी ग्राहकांना मदत होणार आहे. याशिवाय युनिक कोडच्या आधारे फोनमधील सर्वच हालचालींवर दूरसंचार विभागाची नजर असणार आहे. आपल्या फोनद्वारे कुणी चुकीचे  काम करत असेल तर त्याची माहिती व प्रसारण विभागाला तात्काळ माहिती मिळणार असून तो मोबाईल फोन  ट्रेस करणे सोपे जाईल.
 सद्यस्थितीत विभागाकडे मोठ्या प्रमाणात मोबाईल युजर्संची माहिती आहे. युनिक कोड संदर्भाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून काम सुरू होते अशी माहिती सूत्रांनी दिली. तंत्रज्ञानाशी संबंधित इतर कंपन्यांनीही यात सहभागी व्हावे असे आवाहन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. प्रोग्रॅमिंगच्या माध्यमातून डिवाईसचा युनिक कोड बनविण्यात येतो. या कोडसंदर्भात माहिती देण्याचे आदेश स्मार्टफोन कंपन्यांना देण्यात आले आहेत.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!