मोबाईलसाठी झूम लेन्स; स्पीकर असलेला स्मार्ट माईक; ओटीजी फॅन नाशिकमध्ये उपलब्ध

0

तुम्ही टेक्नोसेव्ही आहात ?

फोटोग्राफीची आवड तर आहे पण कॅमेरा घेऊ शकत नाही?

मोबाईल अँसेसरीज तर हव्यात पण त्या महाग आहेत असं वाटतंय ? 

मोबाईलवर सिनेमा, व्हिडिओ पाहतांना हात दुखण्याचा त्रास होतोय ?

तुम्ही क्लासेस घेतात पण मोठ्या आवाजात बोलल्याने घसा दुखतोय ? 

जर तुमची उत्तरे हो असतील तर खास तुमच्यासाठी देत आहोत वापरण्यास अगदी सोप्या आणि स्वस्त अशा गँजेट्स ची माहिती. ही गॅझेटस्‌ अगदी परवडतील अशा किंमतीत नाशिकमध्येच उपलब्ध आहेत. जळगावमध्ये गोलानी मार्केट परिसरातही यातील काही गॅझेटस्‌ मिळू शकतात.

मोबाईलसाठी ८ एक्स झूम लेन्स

फोटोग्राफीची आवड आहे, पण मोबाईल कँमे-याचा झुम कमी पडतो मग हे लेन्स गॅझेट तुमच्यासाठीच आहे. ‘मोनोक्युलर ८ एक्स झुम लेन्स’ वापरून तुम्ही अगदी डिजिटल कँमे-यासारखं रिझल्ट प्राप्त करू शकता. फक्त गरज आहे ती तुम्ही योग्य फ्रेम निवडून, नैसर्गिक लाईटचा क्रिएटिव्ह वापर करत एक्सप्लोझर सेट करण्याची आणि तुम्हाला हवा तो क्षण तुम्ही अगदी सहजरित्या कैद करू शकता. ही टेलिफोटोलेन्स घ्यायला तुम्हाला कुठे लांब जाण्याची गरज नाही आपल्याच नाशिक शहरातील महात्मा गांधी रस्त्यावरील प्रधान पार्क मध्ये तुम्हाला फक्त ६३० रूपयांत ही लेन्स उपलब्ध होते.

वायरलेस माईक आणि स्पीकर

तुम्ही कोचिंग क्लासेस चालवत, किंवा विविध कारणांसाठी तुम्हाला मोठ्या समुहाशी बोलावे लागते. अशा वेळी अगदी सहज बोलून तुम्हाला तुमचा आवाज प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहचवायचा आहे ? यासाठी तुम्हाला महागातली साऊंड सिस्टम्स घेण्याची गरज नाही.

केवळ ५८० रूपयांत ‘ इक्विलायझर आँल इन वन माईक ‘  आपल्यासाठी उपलब्ध आहे. मोबाईल चार्जरने सहज चार्ज होणा-या या माईक मध्ये आपणास युएसबी पोर्ट सोबतच इनबिल्ट स्पीकर देण्यात आला आहे. आणि याचा आकार सहज हाताळता येईल असा असल्यामुळे तुम्ही तुमच्या बँगेत ठेऊन अगदी सहज कुठेही नेऊ शकता. शिवाय युएसबी पोर्ट वापरून तुम्ही रेकाँर्ड केलेले लेक्चर किंवा कुठला ही आँडिओ यात प्ले करू शकता.

मोबाईलवर चालणारा मिनी ओटीजी फॅन

बस, ट्रेन, घरी किंवा क्लासरूम मध्ये ब-याचदा आपल्याला उकडते, पण पंखा काही केल्या चालत नाही. कधी गर्दी जास्त असते तर कधी लाईट नसते. घरात इनव्हर्टर असेल तर पंखा चालवता येतो पण बाहेर पडल्या वर काय ?

त्यावर उत्तर म्हणून आता बाजारात पाँकेट फ्रेंडली फँन आला आहे. तुमच्या मोबाईलला ओटीजीव्दारे कनेक्ट होणारा ‘ मीनी पोर्टेबल ओटिजी फँन ‘ तुम्हाला हवा तिथे गारवा मिळवून देऊ शकतो. हा फँन मोबाईल सोबतच टँबलेट , पीसी ,लँपटाँप या सर्व उपकरणांना कनेक्ट करून वापरता येऊ शकतो आणि किंमत आहे मात्र १२० रुपये.

मोबाईल होल्डर

आता मोबाईलवर सिनेमा किंवा व्हिडिओ पाहताना हात दुखवण्याचा गरज नाही. फक्त ‘ मोबाईल होल्डर ‘ या गॅझेटमध्ये एका बाजूला आपला मोबाईल ठेवा आणि भिंत, टेबल किंवा खाली मोबाईल होल्डर ची दुसरी बाजू ठेवा बस एकदा मोबाईल सेट झाला की तासनतास हात न दुखवता तुम्ही तुमचा सिनेमा अथवा विडीओचा आनंद घेऊ शकता. हात दुखण्याची चिंता दूर करणारं हे ‘ मोबाईल होल्डर ‘ आपल्या खिशाला कात्री न लावता परवडेल अशा किंमतीत म्हणजे १०० रूपयांत नाशिकात उपलब्ध आहे.

 

– भरत निकम, गणेश जाधव

LEAVE A REPLY

*