मोभारकरांच्या ‘सू’मुळे छी-थू

0

नगर टाइम्स,

तोफखान्यात अजय साळवेंची एफआयआर! , निर्मलनगरच्या शिंदेचीही तक्रार

अहमदनगर (प्रतिनिधी) – सोशल मिडियावर धार्मिक भावना दुखावतील असे मेसेज टाकल्याबद्दल मिलिंद मोभारकर यांच्याविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आला आहे. रिपाईचे अजय साळवे यांनी तशी फिर्याद दिली आहे. याशिवाय सावेडीतील निर्मलनगरचे सोमनाथ साहेबराव शिंदे यांनीही तोफखाना पोलिसांकडे स्वतंत्र तक्रार दिली आहे.

मोभारकर यांनी भीमाकोरेगावचे लोकेशन सोशल मीडियावर देत विजय स्तभांकडे तोंड करून लघुशंका केल्याची पोस्ट काल बुधवारी व्हायरल केली. ही पोस्ट नगरभर फिरली. त्यांच्या या पोस्टमुळे दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. तसेच आमच्या धार्मिक भावना दुखावल्याचे साळवे यांच्या तक्रारीत म्हटले आहे. त्यावरून पोलिसांनी भादंवि 295अ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. निर्मलनगरच्या सोमनाथ साहेबराव शिंदे यांनीही तोफखाना पोलिसांकडे स्वतंत्र तक्रारअर्ज दिला आहे. शिंदे यांचा तक्रार अर्ज पोलीस दप्तरी जमा झाला आहे. मोभारकर सोशल मीडियात हे बर्‍याचदा आक्षेपार्ह पोस्ट टाकत असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

*