Type to search

आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या

गोहत्येच्या मुद्द्यावरुन हिंसाचार, जमावाच्या हल्ल्यात पोलीस निरीक्षकासह दोनजण ठार

Share

बुलंदशहर : गोहत्येच्या संशयावरून उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये प्रचंड उद्रेक झाला. संतप्त जमावाने दगडफेक करीत पोलीस ठाण्यावर हल्ला केला. पोलीस व्हॅनसह अनेक वाहनांना आग लावण्यात आली. पोलीस ठाण्यावर केलेल्या गोळीबारात एका पोलीस निरीक्षकाचा मृत्यू झाला. पोलिसांनी संतप्त जमावर केलेल्या गोळीबारात एक तरुण ठार झाला आहे. दरम्यान बुलंदशहर आणि परिसरात प्रचंड तणाव असून, रॅपीट ऍक्शन फोर्ससह पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

बुलंदशहरमधील एका गावात 25 मृत गायी आढळल्या. या गायींची हत्या केल्याचा संशय गावकऱयांना आला आणि हे वृत्त वाऱयासारखे पसरले. लोकांनी टॅक्टर ट्रलीमध्ये गाइचे शव टाकले आणि बुलंदशहर पोलीस स्टेशनबाहेर जमाव जमला. संतप्त जमावाने रस्त्यावर आंदोलन सुरू केले. सकाळी 11 वाजता जमावाने पोलीस स्टेशनवर दगडफेक सुरू केली. स्टेशनच्या आवारातील पोलीस व्हॅन जाळली. रस्त्यावरील अनेक वाहने पेटविली.

उत्तर प्रदेशातील बुलंदशहरात झालेल्या हिंसाचारात पोलीस उपनिरीक्षक सुबोध सिंह यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी साक्षीदार असणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा ते जखमी अवस्थेत असणाऱ्या सुबोध सिंह यांना घेऊन जात होते, तेव्हा जमावाने अचानक त्यांच्यावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. यानंतर साक्षीदार असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी तेथून कसाबसा पळ काढत आपला जीव वाचवला, मात्र सुबोध सिंह यांना आपले प्राण गमवावे लागले.

एडीजी (कायदा आणि सुव्यवस्था) आनंद कुमार यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलीस निरीक्षक सुबोध कुमार सिंह यांच्यावर कशाने वार करण्यात आले यासंबंधी अद्याप ठोस माहिती हाती आली नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तसंच स्थानिक निवासी सुमित यांच्यावर कोणी गोळी चालवली याचीही माहिती अद्याप मिळाली नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. यादरम्यान पोलीस निरीक्षक सुबोध यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला असून गोळी लागल्याने मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!