बेस्ट संपाविरोधात मनसे आक्रमक; कोस्टल रोडचे काम बंद पाडले

0
मुंबई : संपावर तोडगा काढला नाही तर सोमवारी मुंबईत तमाशा करु असा इशारा बेस्ट प्रशासनाला दिल्यानंतर मनसे रस्त्यावर उतरली आहे. मनसेने कोस्टल रोडचं काम बंद पाडलं आहे. वरळी येथे सुरु असलेल्या कोस्टल रोडच्या कामाला मनसेने विरोध दर्शवला आहे.

मनसे कार्यकर्त्यांनी काम करणारे कर्मचारी तसंच तेथील सर्व मशीन्स हलवण्यास भाग पाडलं आहे. यासोबत तात्पुरत्या स्वरुपात उभारण्यात आलेल्या कार्यालयांना टाळं ठोकलं आहे. संप मिटत नाही तोपर्यंत कोस्टल रोडचं सुरु करु देणार नाही असा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे.

बेस्ट संप प्रकरणी आज उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मनपा, बेस्ट आणि कामगार संघटनांमध्ये चर्चेच्या फेऱ्या होऊनही संपावर कोणताच अंतिम निर्णय झालेला नाही. सरकारकडून नेमण्यात आलेल्या  उच्चस्तरीय समितीची मात्राही संपावर तोडगा काढू शकलेली नाही. बेस्ट कर्मचाऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सुद्धा भेट घेतली होती. राज यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांना एकजूट राहण्याचा सल्ला दिला होता.

दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे सकाळी अकरा वाजता मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन बेस्ट संपावर चर्चा करणार असल्याची माहिती मिळाली आहे. बेस्ट संपाचा आज सातवा दिवस असून मुंबईकरांचे मात्र अतोनात हाल होत आहेत.

पालिका, बेस्ट प्रशासन आणि कामगार संघटनांमध्ये झालेल्या चर्चेदरम्यान कोणताही तोडगा निघू न शकल्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरुच आहे. दरम्यान संपाबाबत दाखल याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. यावेळी राज्य सरकार उच्च न्यायालयात आपली बाजू मांडणार आहे.

LEAVE A REPLY

*