Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : भल्या-भल्यांना लाजवेल असा दिलीप दातीर यांचा बाला डान्स होतोय व्हायरल

Share

नवीन नाशिक | निशिकांत पाटील 

विधानसभेच्या निवडणुकांचा धुराळा नुकताच उडाला. अनेक प्रतिष्ठेच्या लढतीत दिग्गजांना अक्षरश: लोळवले. नाशिक शहरातील पश्चिम मतदारसंघातील मनसेनेचे दिलीप दातीर यांचादेखील पराभव झाला.

राजकारणात जय पराजय होत असतो. पराभवाची नाराजी जास्त मनाला लाऊन घ्यायची नसते, आलेला क्षण आनंदी कसा साजरी करता येईल याचा प्रत्यय आज दातीर यांच्या बाला चित्रपटातील गाण्याच्या डान्सवरून नजरेस पडेल.

दिवाळीनिमित्त आलेल्या पै-पाहुण्या नातलगांसोबत दातीर यांनी बाला चित्रपटातील गाण्यावर घराच्या गच्चीवर डान्स केला. एका मोबाईल अप्लिकेशनमध्ये रेकॉर्ड केलेला डान्स सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.

अनेक ठिकाणी हा व्हिडीओ ‘अपयशाने खचून न जाता पुन्हा नव्याने उभारी घ्या असा संदेश लिहून व्हायरल होत आहे. सध्या सर्वत्र चर्चेत असलेला अक्षय कुमारचा चित्रपट हाउसफुल 4 या चित्रपटातील गाणे “बाला ओ बाला” हे जास्तच लोकप्रिय होत आहे.

दिलीप दातीर यांचा बाला डान्स व्हायरल

Video : भल्या-भल्यांना लाजवेल असा दिलीप दातीर यांचा बाला डान्स होतोय व्हायरलRead More👇https://www.deshdoot.com/mns-dilip-datir-bala-dance-viral-breaking-news/

Posted by Deshdoot on Thursday, 31 October 2019

दातीर यांचा याच गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने अपयशी उमेदवारांना यातून प्रेरणा मिळेल असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

दातीर यांनी शिवसेनेच्या नगरसेवक पदाचा राजीनामा देत शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली व मनसेत प्रवेश करून नाशिक पश्चिमसाठी उमेदवारी मिळवली होती.  मात्र या निवडणुकीत त्यांना तिसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळाले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!