#MeToo: अदिती मित्तलनं महिलेचं चुंबन घेतलं?

0
मुंबई : #MeToo मोहिमेअंर्तगत अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. त्यात कनीज सुरका हिनं अदिती मित्तलवर केलेले आरोप अधिक धक्कादायक होते. महिला हास्य कलाकार अदिती मित्तलने बळजबरीनं चुंबन घेतल्याचा आरोप कनीज सुरका या महिलेने केला आहे. या आरोपानंतर एकच खळबळ उडाली आहे. महिलेनेच महिलेसोबत लैंगिक गैरवर्तणुक केल्याचं हे पहिलंच प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणानंतर अदितीनं कनीजची जाहीर माफी मागितली आहे.

कनीज सुरका हिनं ट्विट करून यासंदर्भात आवाज उठवला आहे. अदिती मित्तलनं माझं बळजबरीनं चुंबन घेतलं. माझ्याबाबत जे घडलंय ते सांगणं गरजेचं आहे. दोन वर्षापूर्वी अंधेरीत एक कॉमेडी शो सुरू होता. त्यावेळी अदिती उठली व माझ्याजवळ आली व मला न विचारताच तिनं बळजबरीनं माझं चुंबन घेतलं. या प्रकारामुळे मला धक्का बसला व ही गोष्ट माझ्यासाठी लाज आणणारी आहे. वर्षभरातनंतर मी हिंमत करून अदितीला याविषयी विचारलं तर तिनं आधी माफी मागितली. परंतु, नंतर तिनं मलाच खडसावले. #MeToo चळवळीत तिनं आवाज उठविल्याबद्दल तिचं कौतुक करण्यात येतंय. या सर्व प्रकारामुळं मला फार अस्वस्थ वाटू लागलंय, असं तिनं तिच्या पोस्टमध्ये म्हटलंय.

LEAVE A REPLY

*