Gallery : विधानभवनाबाहेर रंगला आमदारांचा फुटबॉल सामना

0
मुंबई | विधानभवन परिसरात सतरा वर्षाखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचे आज उद्घाटन करण्यात आले. प्रारंभीच्या उद्घाटन सराव सामन्याला जल्लोषात सुरुवात झाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच मिशन XI मिलियनची घोषणा केली आहे. त्याला प्रतिसाद देत महाराष्ट्रात क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी मिशन 1 मिलियन- अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय अभियानाची योजना केली आहे.

या अभियानाची प्रचार प्रसिध्दी करण्यासाठी विधीमंडळ परिसरात आमदारांचा सामना आयोजित केला होता. अध्यक्ष XI विरुध्द सभापती XI असा सामना आज विधीमंडळाच्या परिसरात दुपारी 04.00 वाजता खेळवण्यात आला.

आरोग्य व आनंदासाठी फुटबॉल असे अभियान संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे. या दरम्यान महाराष्ट्रात सर्व शाळांमध्ये फुटबॉल सामने, आमदार चषक फुटबॉल व विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण व कार्यशाळा इत्यादींचे आयोजन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*