ध्यास स्वप्नपूर्तीचा : मतदारसंघ हायटेक करणार

0
2009 च्या निवडणुकीत मतदारसंघाची पुनर्रचना होऊन देवळाली मतदार संघाचे विभाजन झाले. नाशिक तालुक्याच्या ग्रामीण भागातील 90 टक्के भाग या मतदार संघात मोडतो. महापालिकेचे केवळ दोन प्रभागच यात समाविष्ट आहेत. त्यामुळे नाशिकरोड नव्हे, तर ग्रामीण भागावर मतदारसंघाचे भवितव्य अवलंबून आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक ग्रामपंचायतीला संगणकीकरणाशी जोडून तिचा केंद्रबिंदू पंचायत समिती ठेवला आहे. त्या माध्यमातून मतदारसंघाचा विकास सुुरु आहे.

योगेश घोलप, आमदार

खीव मतदारसंघ असतान देखील अभ्यास करून, विविध शासकीय योजनांची माहिती जमा करून आमदार निधी व्यतिरिक्त इतर योजनांचा निधी मतदारसंघात वापरला गेला. त्यामुळे 62 खेडी, एक नगरपालिका, एक कॅन्टोन्मेंट बोर्ड व महापालिकेतील दोन प्रभाग यामध्ये आपण भरीव कामगिरी करू शकलो. मतदारसंघातील शेवटच्या टोकापर्यंत ठेवलेला जनसंपर्क, निष्ठावंत शिवसैनिकांची साथ, शिवसेना नेत्यांचा आशीर्वाद व वडील माजी मंत्री बबनराव घोलपांचा डोक्यावरील हात यामुळे मतदार संघ हायटेक करण्याकडे आपली यशस्वी वाटचाल सुरू आहे. एकलहरे येथील शासकीय तंत्रनिकेतन शेजारील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची उभारणी हे आपले स्वप्न असून, त्यासाठी शिक्षणमंत्र्यांनी हिरवा कंदील दिला आहे. राखीव असला तरी इतरांच्या तुलनेत देवळाली मतदार संघाचा मोठा विकास झाला आहे. हा झंझावात असाच, पुढे चालविणार असल्याचे आ. योगेश घोलप यांनी सांगितले.

दै. देशदूतच्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर आ. योगेश घोलप बोलत होते. मतदारसंघ हा 90 टक्के ग्रामीण व 10 टक्के शहरी भागात मोडत असून 80 गावे, 66 ग्रामपंचायती, भगूर नगरपरिषद, देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड व महापालिकेचे दोन प्रभाग अशी भौगोलिक रचना असलेल्या या मतदार संघात वालदेवी, गंगापूर, महिरावणी, आळंदी, कश्यपी, दुडगाव असे धरणे आहेत. आमदार म्हणून काम करताना आमदार निधी, विशेष आमदार निधी, मूलभूत सुविधा, बजेट, सार्वजनिक बांधकाम खाते-आदिवासी-नाबार्ड या माध्यमातून विकासकामे केली जातात.

राखीव मतदारसंघ असूनही गेल्या 30 वर्षांपासून येथील मतदारांनी शिवसेनेवर विश्वास व्यक्त करून सातत्याने भगवा फडकत ठेवला आहे. आपले वडील माजी मंत्री व शिवसेना उपनेते बबनराव घोलप यांच्या पावलावर पाऊल ठेवत डोक्यावर बर्फ व तोंडात साखर घेऊन वाटचाल करत आहे. मतदारसंघातील प्रत्येक गावांत विकासाची गंगा पोहोचविताना अनेकांची नाराजी ओढवून घ्यावी लागत आहे. मात्र शासनाने ठरवून दिलेल्या चौकटीत काम करत असताना गेल्या चार वर्षात मुख्यमंत्र्यांनी आमदार निधीत कोणतीही वाढ केली नसल्याने विकासकामे करता तारेवरची कसरत करावी लागत आहे. तरीही राज्यातील राखीव मतदारसंघांचा विकासाचा आलेख बघता तुलनात्मकदृष्ट्या देवळाली विधानसभा मतदारसंघाचा विकास निश्चितच समाधानकारक झाला आहे.

सन 1978 पासून अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या देवळाली विधानसभा मतदार संघात खर्‍या अर्थाने 1990 नंतर विकासाची गंगा वाहू लागली. मतदार संघातील प्रत्येक खेडे हे तालुका पंचायत समितीच्या कार्यालयाशी संगणकीकरणाने जोडले गेले असून, प्रत्येक गावातील मंदिरापुढे उभारण्यात आलेल्या सभामंडपामुळे सामाजिक व संस्कृतीचा वारसा जपला जात असून, गेल्या 25 वर्षात या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शिवसेना उपनेते व माजी आमदार बबनराव घोलप यांनी ज्या प्रकारे प्रयत्न केले आहेत त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून देवळाली मतदार संघाचा विकास साधला जाणार आहे.

देवळाली मतदार संघ राखीव असल्यामुळे राज्य शासनाचे होणारे दुर्लक्ष यामुळे मतदार संघातील जनता विकासाबाबत इतर मतदार संघातील लोकप्रतिनिधींकडे धाव घेत असत. 1985 साली विधानसभेची पहिली निवडणूक वडील बबनराव घोलप यांनी लढवली. पहिल्या निवडणुकीत पराभव स्विकारावा लागला. परंतु अपयश ही यशाची पहिली पायरी असते. त्यानंतर मात्र 1990 पासून सतत विजय प्राप्त करत कधीही मागे वळून पाहिले नाही. 1995 मध्ये राज्यात युतीचे सरकार आले. देवळाली मतदार संघाला आ. बबनराव घोलप यांच्या रूपाने कॅबिनेटमंत्र्यासह पालकमंत्री पद मिळाले. तेव्हापासून मतदार संघाचा खर्‍या अर्थाने विकास सुरू झाला. युतीची सत्ता गेल्यानंतरही 1999 ते 2014 या कालावधीत वडिलांनी देवळाली विधानसभा मतदारसंघाची विजयी परंपरा कायम ठेवली.

गेल्या चार वर्षांपासून आपण सातत्याने मंत्री व अधिकारी वर्गाशी पाठपुरावा करत आहोत. दुगाव-मनोली रोड येथे रस्ता खडीकरण (2.99 लाख), दुगाव-दरी रस्ता मजबूतीकरण व डांबरीकरण (25 लाख), दुगाव-वाडगाव रस्ता (25 लाख), भगूर येथे नूतन बस स्थानक उभारणे (एक कोटी), एकलहरे येथे रस्ता सुधारणे (5 लाख), कोटमगाव येथे जनसुविधा योजने अंतर्गत स्मशानभूमी (5 लाख), डोंगरी विकास कार्यक्रम, सभागृह (6 लाख), सामनगाव येथे मुलभूत योजने अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण (10 लाख) याशिवाय मुख्यमंत्री निधीतून 3 किमीचा रस्ता डांबरीकरणाचा प्रस्ताव दिला आहे. शिंदे येथे डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत मतेवाडी ते आंधळे मळा रस्ता खडीकरण (10 लाख), राजूर बहुला येथे मूलभूत योजने अंतर्गत सभामंडप (10 लाख), धोंडेगाव येथे मुलभूत योजने अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण (2.99 लाख) व पाण्याची टाकी (15 लाख), पिंप्री सय्यद येथे स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत काँक्रीटीकरण (15 लाख), वाल्मिक रस्ता खडीकरण व डांबरीकरण (2.93 लाख), मुलभूत योजने अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण (15 लाख), महिरावणी येथे मुलभूत योजने अंतर्गत सभामंडप (15 लाख), दहेगाव मूलभूत योजने अंतर्गत सभामंडप (10 लाख), गिरणारे येथे जनसुविधा योजने अंतर्गत स्मशानभूमी (5 लाख), आदिवासी विकास योजनेअंतर्गत गंगापूर ते जुना गिरणारे रस्ता मजबूती व डांबरीकरण (25 लाख), अर्थसंकल्पीय तरतूद कामे आडगाव-गिरणारे-वाघेरा-हरसूल रस्ता राष्ट्रीय महामार्ग 28 किमी (4 कोटी 60 लाख), मुलभूत योजने अंतर्गत अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण (2.99 लाख), रस्ता काँक्रिटीकरण (10 लाख), नाईकवाडी येथे डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत सामाजिक सभागृह (10 लाख), मुलभूत योजने अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण (2.99 लाख), गोवर्धन येथे आदिवासी विकास योजने अंतर्गत गोवर्धन-चांदशी-मातोरी-दरी तालुका हद्द, पूल मजबुतीकरण व सुधारणा (20 लाख), लाडची येथे जनसुविधा योजनेअंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय (12 लाख), मूलभूत योजने अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण (10 लाख) मातोरी येथे जनसुविधा योजनेंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय (12 लाख), डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत वीर मंदिर सभामंडप (10 लाख), स्मशानभूमी रस्ता, स्ट्रीट लाईट (3 लाख), हायमास्ट (2 लाख), आदिवासी विकास कार्यक्रमांतर्गत मातोरी ते गरूडवाडी रस्ता मजबुतीकरण (25 लाख), मूलभूत योजने अंतर्गत चौक सुशोभिकरण (10 लाख), वाडगाव येथे आदिवासी विकास योजने अंतर्गत रवळगाव-मनोली-वाडगाव-गिरणारे रस्ता मजबुती व डांबरीकरण (20 लाख), मूलभूत योजने अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण (5 लाख), वासाळी येथे जनसुविधा योजने अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय (12 लाख) मूलभूत योजनेअंतर्गत सभामंडप (10 लाख), बेलगाव ढगा येथे स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत निगळ-मांडे-कर्डिले वस्ती रस्ता खडीकरण (3 लाख), राजवाडा वस्ती (3 लाख), नागरे-काकड वस्ती (3 लाख), मूलभूत योजने अंतर्गत सभामंडप (10 लाख), संसरी जनसुविधा योजने अंतर्गत स्मशानभूमी बांधकाम (8 लाख), मूलभूत योजने अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण (10 लाख), साडगाव येथे आदिवासी विकास योजनेअंतर्गत रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण (25 लाख), नानेगाव येथे जनसुविधा योजने अंतर्गत दारणा नदी किनारी स्मशानभूमी घाट (5 लाख), स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत रस्ता खडीकरण (12 लाख), मूलभूत योजने अंतर्गत भवानी नगर रस्ता काँक्रीटीकरण (5 लाख)व अशी अनेक कामे प्रगतीपथावर आहेत.

LEAVE A REPLY

*