Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

आ. तनपुरे यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानतंर तालुक्यात जल्लोष

Share
आ. तनपुरे यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानतंर तालुक्यात जल्लोष, Mla Tanpure Ministers Workers Happy Rahuri

राहुरी (तालुका प्रतिनिधी) – राहुरी-पाथर्डी-नगर नवनिर्वाचित आमदार प्राजक्त तनपुरे यांची उद्धव ठाकरे मंत्रिमंडळात वर्णी लागून राज्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानतंर राहुरी शहरासह तालुक्यात राष्ट्रवादी व प्राजक्तदादा मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला.

राहुरी तालुक्याला प्रथमच मंत्रिपद मिळाल्याने राहुरी बाजार समिती, शनिचौक, शिवाजी चौक, हेडगेवार चौक, नवीपेठ, नगरपरिषदेसमोर तर बारागाव नांदूर, राहुरी स्टेशन, मांजरी, मानोरी, वांबोरी, ब्राम्हणी, उंबरे येथे कार्यकर्त्यांनी फटाके फोडून मिठाई वाटली.

दरम्यान, मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या पूर्व संध्येला संभाव्य मंत्रिमंडळाच्या यादीत आ. तनपुरे यांचे नाव असल्याची बातमी राहुरीत समजताच शहरात व तालुक्यात त्यांच्या अभिनंदनाचे फलक कार्यकर्त्यांनी लावले. तसेच कार्यकर्त्यांनी आ. तनपुरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबाचे अभिनंदन करून शुभेच्छांचा वर्षाव केला. तर काही कार्यकर्ते शपथविधीसाठी मुंबईला रवाना झाले.

सन 1952 साली तालुक्याचे सुपुत्र ल.मा.कोळसे पाटील यांच्या नंतर तब्बल 67 वर्षांनंतर आ. तनपुरे यांच्या रूपाने तालुक्याला मंत्रिपद मिळाल्याने तरुणवर्ग व मतदार सर्वत्र आनंद साजरा करताना दिसत होते.

आ. तनपुरे यांच्या मंत्रिपदाच्या शपथविधीप्रसंगी त्यांच्या पत्नी सोनालीताई तनपुरे, बंधू हर्ष तनपुरेंसह कुटुंबातील सदस्य, राहुरीचे नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते. शपथविधीनंतर ना. तनपुरे यांचे मुंबई येथील बि 2 बंगल्यावर आगमन होताच मतदार संघातून आलेल्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करून घोषणाबाजी केली.

  • प्राजक्त तनपुरेंचा परिचय
  • जन्म 13 सप्टेंबर 1976 (वय 43) शिक्षण- प्राथमिक शिक्षण नगरपरिषद मराठी शाळा, माध्यमिक शिक्षण शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्रगती विद्यालयात, पुण्यात इंजिनीअरींग व पदव्युत्तर एम.एस. (टेल्सा ओक्लाहोमा, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, वर्ष -2005), श्री. प्रसादराव बाबुराव तनपुरे (वडील), सौ. उषाताई प्रसादराव तनपुरे (आई) व पत्नी सौ. सोनाली देशमुख-तनपुरे, मुलगा-सोहम प्राजक्त तनपुरे, आरोही प्राजक्त तनपुरे (रा. तनपुरे गल्ली, राहुरी बु., ता.राहुरी, जि. अहमदनगर)
  • राहुरी नगरपालिकेतून नगरपरिषदेच्या अध्यक्षपदाची पहिली नगरपालिका निवडणूक जिंकली. ऑक्टोबर 2019 मध्ये, विधानसभा निवडणुकीच्यावेळी त्यांनी विधानसभेच्या राहुरी मतदारसंघातून निवडणूक लढविली आणि ती जागा जिंकली.
  • आजोबा माजी आ.स्व. डॉ. बाबुराव तनपुरे हे 10 वर्षे आमदार होते. व आईचे वडील महाराष्ट्राचे नेते स्व. राजारामबापू पाटील, वडील प्रसाद तनपुरे हे 25 वर्षे आमदार व काही काळ कोपरगाव लोकसभा मतदार संघातून खासदार, आई डॉ.उषाताई तनपुरे माजी नगराध्यक्षा.

बर्‍याच कालावधीनंतर राहुरी-नगर-पाथर्डी मतदार संघाची धुरा युवा नेतृत्वाच्या हाती आली. त्यातच मंत्रिपद मिळाल्याने दुग्धशर्करा योग आला. मंत्रिपदाच्या माध्यमातून मतदार संघातील प्रलंबित प्रश्न व शेतीच्या पाण्याचे प्रश्न येत्या पाच वर्षात मार्गी लागतील. यासाठी पवार साहेबांचे आभार .
-अरुण तनपुरे, सभापती, राहुरी बाजार समिती

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!