कसाऱ्याजवळील अपघातात आ. सीमा हिरे सुखरूप

0
नाशिक | नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघाच्या भाजपच्या आमदार सीमा हिरे यांच्या वाहनाला आज सकाळी कसारा घाटात अपघात झाला. या अपघातात वाहनाचे किरकोळ नुकसान झाले असून आ. सीमा हिरे, त्यांचा चालक, त्यांची मुलगी आणि अंगरक्षक सुखरूप आहेत.
अपघात अगदी किरकोळ दुखापत झाल्याची आणि आई सुखरूप असल्याची माहिती आमदार हिरे यांच्या मुलीने ‘देशदूत’शी बोलताना सांगितले.

मुंबई येथील मॅग्नटिक महाराष्ट्र परिषदेत सहभागी होण्यासाठी आ. हिरे सकाळी नाशिकहून चालल्या होत्या. सोबत त्यांची मुलगीही होती.

अपघातास कारणीभूत ठरलेला समोरील वाहनचालक कसारा येथील असल्यामुळे ग्रामस्थांनी प्रचंड गर्दी अपघातस्थळी केल्याचे समजते.

आ.हिरे यांच्या गाडीला एका वाहनधारकाने मागून धडक दिली होती. सदर वाहन चालक पळून जाण्याचा प्रयत्न करीत असतांना आ. हिरे यांच्या चालकाने त्याला पकडले. त्या वेळी जवळच क्रिकेट खेळणारे काही तरुण  बॅट व स्टंप घेऊन धावून आले.

त्यावेळी बाचाबाची झाली. सदर वाहन चालक स्थानिक होता त्यामुळे इतर गावकरीही त्याच्या बाजूने धावून आले. त्यामुळे असता बचावासाठी पिस्तुल काढले असल्याची माहिती मिळाली. यासंदर्भात घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

दरम्यान, आमदार हिरे यांच्या सुरक्षारक्षकाने अपघात झाल्यानंतर समोरच्या वाहनचालकावर सर्व्हिस रिवॉल्वर रोखले त्यामुळे ग्रामस्थांनी आमदार हिरेंच्या वाहनाला घेराव घातल्याचा संदेश समाज माध्यमांत व्हायरल झाला होता. ही    अफवा असल्याचे आमदार हिरे यांनी स्पष्ट केले असून त्यावर विश्वास ठेवू नये असे आवाहन त्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*