Thursday, May 2, 2024
Homeनगरपुरातन वृक्ष गणनेसोबतच स्वच्छतेला सुरूवात

पुरातन वृक्ष गणनेसोबतच स्वच्छतेला सुरूवात

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मनपाचा शहर स्वच्छता अभियान हा उपक्रम कौतुकास्पद आहे. यामुळे शहराची वाटचाल स्वच्छतेच्या दिशेने सुरू असून शहर स्वच्छ व सुंदर राहण्यास मदत होईल. चौकांचे सुशोभीकरण, रस्त्यावरील दगड, गोटे, माती उचलली जात आहे. नागरिकांनीही या अभियानात सहभागी होऊन सहकार्य करावे, वृक्षसंवर्धन समितीचे अध्यक्ष संपत बारस्कर यांच्या माध्यमातून शहर हरित करण्याचा संकल्प केला आहे. आजपासून पुरातन वृक्षांची गणना सुरू झाली असून शहरांमध्ये 5 हजार वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन केले जाणार असल्याची माहिती आ.संग्राम जगताप यांनी दिली.

- Advertisement -

नगर महानगरपालिकेच्या वतीने इम्पेरियल चौक ते चाणक्य चौकदरम्यान शहर स्वच्छता अभियान राबवून पुरातन वृक्षांच्या गणनेचा शुभारंभ आ. जगताप यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी उपमहापौर गणेश भोसले, विरोधी पक्षनेता संपत बारस्कर, आयुक्त शंकर गोरे, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, नगरसेवक प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, संजय शेंडगे, उपायुक्त यशवंत डांगे, उद्यान प्रमुख मेहर लहारे, दिपक गांगर्डे आदी उपस्थित होते.

यावेळी उपमहापौर गणेश भोसले म्हणाले, आ. जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शहरांमध्ये स्वच्छता अभियान व वृक्ष संवर्धन तसेच हरित नगर या संकल्पना राबण्यात येत आहे. या संकल्पना यशस्वी करून दाखविणार आहे. आयुक्त गोरे म्हणाले, महापालिकेच्या माध्यमातून इम्पेरियल चौक ते चाणक्य चौक दरम्यान स्वच्छता अभियान राबविण्यात आलेले आहे. याचबरोबर 30 जुलैला माळीवाडा परिसरात स्वच्छता अभियान राबविले होते. माळीवाडा वेशी जवळ हुतात्मा स्तंभाजवळ अस्वच्छता निदर्शनास आली. याठिकाणी स्वच्छता करून पोयटा टाकून फुलांची झाडे लावून सर्व परिसर स्वच्छ करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या