मत दिल्याचा पश्चाताप होणार नाही, असे लोकप्रतिनिधी निवडून द्या : संग्राम जगताप

0

राजकारणापेक्षा विकासाला महत्त्व

अहमदनगर (प्रतिनिधी) – राजकारणापेक्षा शहर विकासाचा अजेंडा नेहमीच आमच्या डोळ्यासमोर असतो. वार्डातील समस्या सोडविणारा लोकप्रतिनिधी (नगरसेवक) निवडून दिल्यास पश्‍चाताप करण्याची वेळ येत नाही. शहराला महानगराचे रूप देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. मत दिल्याचा पश्‍चात होणार नाही असे लोकप्रतिनिधी तुम्हीही निवडून द्या असे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
नगरसेवक संपत बारस्कर यांच्या प्रयत्नातून सावेडीतील भिडे चौकात पथदिव्यांचे लोकार्पण आमदार जगताप यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. गटनेते संपत बारस्कर, प्रदेश उपाध्यक्ष कुमारसिंह वाकळे, योगेश ठुबे, ज्येष्ठ नागरिक सुरेश छाजेड, पिटू धोकरिया, काका कर्डिले, खाडे, गांगर्डे, जायभाय, फडतरे, रसवाले, भाऊसाहेब भागवत, राजू कटारिया, वाघ, संजय दगडे, साहेबराव दंडवते, डॉ. देशपांडे, परदेशी, चिंतामणी उपस्थित होते.
आ. जगताप पुढे म्हणाले की, नगरसेवक संपत बारस्कर व कुमार वाकळे हे प्रभागापुरते मर्यादित नगरसेवक नाहीत, तर ते उपनगराचे नेतृत्व करणारे नगरसेवक आहेत. समाजाचे प्रश्न जाणून घेऊन ते सोडविण्यासाठी नेहमीच धडपड करीत असतात. सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याच्या त्यांच्या पद्धतीमुळे प्रभागाचा विकास झाला. संपत बारस्कर सारख्या नगरसेवकाला निवडून दिल्यामुळे प्रभागातील समस्यांचे निराकरण झाले. लोकप्रतिनिधी चांगला निवडून दिल्यास नागरिकांना पश्चाताप करण्याची वेळ येत नाही. सावेडी नाका, वैदूवाडी, पाईपलाईन रोड हा डीपी रस्ता असून, या रस्त्याच्या विकासासाठी शासकीय निधीची गरज लागणार आहे. यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे. शासकीय निधीचा उपयोग योग्य कामासाठी होणे गरजेचे असते.

स्वत:च्या वार्डात काम न करणार्‍या महापौर शहराचा विकास काय करणार?
शासकीय निधीचा उपयोग महापालिकेतील सत्ताधारी चांगल्या कामासाठी वापरत नाही. महापौरांना त्यांच्या प्रभागात दीड वर्षांत विकासकामे करता आली नाहीत. त्यांच्यापेक्षा माझ्या वॉर्डात 15 कोटींची विकासकामे आपण करून घेतली. महापौर हे स्वत:च्या प्रभागाचा विकास करू शकत नाही, ते काय शहराचा विकास करणार असे शरसंधान साधत संपत बारस्कर यांनी वर्षभरात प्रभाग हा समस्यामुक्त प्रभाग होईल असे आश्‍वासन दिले.

LEAVE A REPLY

*