Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रआमदारांच्या वेतनात 30 टक्के कपात

आमदारांच्या वेतनात 30 टक्के कपात

राज्यातील अर्थव्यवस्थेच्या अभ्यासासाठी दोन समित्या
मुंबई – कोरोनामुळं राज्यासमोर मोठं आर्थिक संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्यातील सर्व विधिमंडळ सदस्य, लोकप्रतिनिधींच्या वेतनात या महिन्यापासून म्हणजे एप्रिल 2020 पासून एप्रिल 2021 पर्यंत 30 टक्के वेतन कपात करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

काही महत्वपूर्ण निर्णयही घेण्यात आले. कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अर्थव्यवस्थेवर परिणाम झालेला आहे. या संदर्भात दोन समित्या नेमण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. पहिली समिती ही आर्थिक परिणामांचा पुनरुज्जीवन अहवाल तयार करेल. यात अर्थतज्ज्ञ, उद्योजक, निवृत्त अधिकारी, वित्त विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश असेल.

- Advertisement -

याशिवाय दुसरी समिती ही मंत्रिमंडळातील सदस्यांची असून त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे, अनिल परब यांचा समावेश असेल. दरम्यान कोरोना संदर्भात राज्यातील वाढते रुग्ण लक्षात घेता लॉकडाऊनची अंमलबजावणी अधिक कडक करण्याबाबत तसेच निवारा केंद्रांमध्ये भोजन, शिवभोजन यांची क्षमता अधिक वाढविणे व लाभार्थी नागरिकांना अधिक चांगली सुविधा देणे. याबाबत मंत्रिमंडळातील सदस्यांनी महत्त्वपूर्ण सूचना केल्या,याची देखील काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

1 मे रोजी परेड नाही – येत्या 1 मे रोजी राज्यभरात होणारे ध्वजारोहण हे केवळ पालकमंत्री, जिल्हाधिकारी व निवडक मान्यवरांच्या उपस्थितीतच होईल. कुठलाही समारोह किंवा परेड होणार नाही असा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या