Friday, May 3, 2024
Homeनगरसमताच्या ठेवी अभेद्य सुरक्षा कवचामुळे अधिक सुरक्षित- आ. रणधीर सावरकर

समताच्या ठेवी अभेद्य सुरक्षा कवचामुळे अधिक सुरक्षित- आ. रणधीर सावरकर

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

महाराष्ट्रातील पतसंस्था चळवळीत महत्वपूर्ण योगदान देणारी समता नागरी सहकारी पतसंस्थेने 37 व्या वर्षात पदार्पण केले असून समताच्या ठेवीदारांच्या ठेवी समताच्या अभेद्य सुरक्षा कवचामुळे अधिक सुरक्षित झाल्या असून भविष्यात येणार्‍या संकटांना सामोरे जाण्याची ताकद समतात आहे असे गौरवोद्गार अकोला जिल्ह्यातील निशांत मल्टीस्टेट को-ऑप.क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष व अकोला विदर्भ चे आमदार रणधीर सावरकर यांनी काढले.

- Advertisement -

समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या 36 व्या वर्धापन दिनानिमित्त समता इंटरनॅशनल स्कूल येथे समता ग्राहक कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ते म्हणाले, काका कोयटे राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून सहकारात उल्लेखनीय काम करत असताना शैक्षणिक क्षेत्रात ही संदीप कोयटे व स्वाती कोयटे यांच्यासारख्या कुशल नेतृत्वाच्या आधारे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर गुणवत्तापूर्ण शिक्षण देत एक सामाजिक दायित्वाची भूमिका पार पाडत प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.

अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष काका कोयटे होते. प्रास्ताविक करताना संस्थेचे संचालक संदीप कोयटे म्हणाले, सभासद, ठेवीदारांच्या विश्वासामुळे समताने आज 37 व्या वर्षात पदार्पण केले असून सोने तारणासारख्या सुरक्षित कर्ज प्रकारचा अवलंब करत लिक्विडीटी बेस प्रोटेक्शन फंड अंतर्गत समताच्या 8 हजार 794 ठेवीदारांच्या 99.35 ठेवीदारांच्या प्रत्येकी 15 लाख रुपायापर्यंतच्या ठेवी सुरक्षित झाल्या आहे. उर्वरित ठेवीदारांच्या ठेवी अति सुरक्षित कर्ज प्रकारामुळे त्या ही अति सुरक्षित आहे. या पुढे ही महाराष्ट्रातील समताच्या सर्वच ठेवीदारांच्या ठेवींना अधिक अभेद्य सुरक्षा कवच प्राप्त करून देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत.

गेल्या दोन वर्षांपासून करोना महामारीमुळे समताच्या सभासद, ठेवीदारांचे संस्थेत येणे जाणे, भेटी गाठी होत नसल्याने समताच्या 37 व्या वर्धापन दिनी समताचे सभासद, ठेवीदारांचा कृतज्ञता सोहळा आयोजित करून त्यांना या निमित्ताने चला हवा येऊ द्या मालिकेतील कलाकार भाऊ कदम, श्रेया बुगडे, स्नेहल शिदम व अंकुर गाढवे यांच्या हास्य नाटिकांची मेजवानी ही देण्यात आली. कार्यक्रमाला प्रेरणा पतसंस्थेचे सुरेश वाबळे, साई आदर्श मल्टीस्टेटचे शिवाजी कपाळे, मंगलनाथ मल्टीस्टेटचे रवींद्र कानडे, तुळजाभवानी मल्टीस्टेटचे चंद्रकांत शेजुळ, महात्मा बसवेश्वर पतसंस्थेचे श्रीकांत साखरे, तुळजाई अर्बन मल्टीस्टेटचे राकेश न्याती, समता रुरल मल्टीस्टेटचे विठ्ठल अभंग, राघवेश्वर पतसंस्थेचे गोपीनाथ निळकंठ, सुरज पतसंस्थेचे अशोक कोठारी, मंदावी पतसंस्थेचे आशुतोष पटवर्धन, तहसीलदार विजय बोरुडे, पोलिस निरीक्षक वासुदेव देसले, सहायक निबंधक एन.जी ठोंबळ, बिडीओ सचिन सूर्यवंशी, गटशिक्षणाधिकारी शबाना शेख, समता स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी स्वाती कोयटे यांची उपस्थिती होती.

समता पतसंस्थेचे जेष्ठ संचालक गुलाबचंद अग्रवाल, अरविंद पटेल, जितूभाई शहा, चांगदेव शिरोडे, गुलशन होडे, निरव रावलिया, कचरू मोकळ, अशोक दरक, मुख्य कार्यालयाचे अधिकारी, शाखाधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.उपस्थितांचे आभार जनरल मॅनेजर सचिन भट्टड यांनी मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या