Type to search

नाशिक

मखमलाबाद परिसरात अवकाळीचा फटका; आमदार ढिकले यांची नुकसान ग्रस्त भागात पाहणी

Share

पंचवटी वार्ताहर

अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. नाशिक पूर्व मतदार संघाचे आमदार ऍड. राहुल ढिकले यांनी शहरातील नुकसान ग्रस्त भागांची पाहणी केली.

देशभरात यंदा दिवाळी उत्साहात साजरी केली जात असताना नाशिक जिल्ह्यातील मखमलाबाद मधील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा चांगलाच फटका बसला. या पार्श्वभूमीवर नाशिक पूर्व मतदार संघाचे आमदार राहुल ढिकले यांनी नुकसान ग्रस्त मतदार संघातील मखमलाबाद गावांत जाऊन पाहणी केली.

शेतकऱ्यांच्या अडचणी त्यांनी जाणून घेतल्या.शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून पिक विमा कंपन्यांना भरपाई देण्याबाबद प्रशासनाने पाठपुरावा करावा अश्या सूचना दिल्या. यावेळी तहसीलदार,तलाठी यांच्यासह नुकसानग्रस्त शेतकरी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!