Friday, April 26, 2024
Homeनगरसामान्य माणसाला समृद्ध करणार्‍या पंचसुत्रीचे स्वागत - आ. राजळे

सामान्य माणसाला समृद्ध करणार्‍या पंचसुत्रीचे स्वागत – आ. राजळे

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

शेतकरी-कष्टकर्‍यांपासून ते समाजाच्या अंतिम घटकापर्यंत सर्वार्थाने पोहोचलेला व कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला दिलासा देणारा क्रांतिकारी अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर करत सामन्यांचे हित साधले आहे. सामान्य माणसाला समृद्ध करणार्‍या या पंचसूत्रीचे सर्वजनता मनःपूर्वक स्वागत करत आहे. असे आमदार मोनिका राजळे यांनी सांगितले.

- Advertisement -

पाथर्डी येथे प्रसिद्धी माध्यमांशी आ. राजळे बोलत होत्या. यावेळी भाजपच्या पदाधिकार्‍यांनी याचे जोरदार स्वागत व समर्थन केले. राजळे म्हणाल्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभ्यासू नेतृत्वाखालीसमृद्ध शेती हे पहिलेच सूत्र यात असल्याने शेतकर्‍यांसाठी अनेक क्रांतिकारी घोषणा शासनाने यावेळी केल्या आहेत. शेतकर्‍यांना किसान सन्मान योजनेत आणखी 6 हजार रुपयांची भर घालत महत्त्वपूर्ण अशा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची घोषणा केली. आता या शेतकर्‍यांना प्रतिवर्षी 12 हजार रुपये मिळणार आहेत.

चौथ्या सर्वसमावेशक महिला धोरणाची घोषणा करत महिला सक्षमीकरणासाठी अक्षरशः प्राण ओतले. महिला बचत गटांचे आर्थिक सक्षमीकरण असेल, महिलांच्या स्वयंरोजगाराच्या बाबतीतील योजना असतील, महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सूट योजना, मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी सारखी अभिनव योजना या सर्वच बाबतीत महिलांना नवी शक्ती देण्याचे काम राज्य सरकारने केले आहे.

स्वयंसेविका आणि अंगणवाडी सेविकांच्या हाकेला साद घालत राज्य सरकारने या अर्थसंकल्पात त्यांच्या मानधनात भरीव वाढ केली. यासह अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या 20 हजार नवीन पद भरतीची घोषणा करत महिलांसाठीच्या नवीन रोजगार संधीची उपलब्धता यात करण्यात आली आहे. या योजनांसाठी अभ्यासपूर्वक तयार केलेल्या निधी वाटपा संदर्भात राज्य सरकार मार्फत त्या काळात नियोजनबद्ध कार्यक्रम आखला जाईल. ही या सर्वच समाजातील नागरिकांसाठी आर्थिक स्वातंत्र्य घोषित करणारी बाब असल्याचे राजळे म्हणाल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या