Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

ईदचे नमाज पठन मैदानावर करण्याची परवानगी मिळावी – आमदार मौलाना मुफ्ती यांची मागणी

Share

मालेगाव | प्रतिनिधी

पवित्र रमजान पर्वात इदगा मैदानांवर नमाज पठणाचे महत्व आहे. त्यामुळे कॅम्प कॉलेज मैदानासह शहरातील इदगाह मैदानावर सकाळी सात वाजता शासनाने नमाज पठणास परवानगी द्यावी अशी मागणी व आग्रह आमदार मौलाना मुक्ती यांच्यासह शहरातील मुस्लिम धर्मगुरू तर्फे करण्यात आला आहे.

काँग्रेसचे माजी आ. आसिफ शेख यांनीदेखील कॉलेज मैदान इदगाह वर नमाज पठण करण्याची परवानगी मागितली आहे. आता मुस्लिम धर्मगुरूंनी देखील ईदगाह मैदानावर नमाज पठणाचा सुर आवळला आहे.

त्यामुळे शासन-प्रशासनातर्फे काय निर्णय घेतला जातो याकडे शहराचे लक्ष लागले आहे. शहरात करोनाचा उद्रेक थांबण्याची चिन्हे दिसत नसून बाधित रुग्णांची संख्या 660 वर जाऊन पोहोचली आहे.

तर 41 जणांचा बळी या विषाणूने घेतला आहे. रुग्ण आढळून येत असलेल्या 119 भागांना प्रतिबंधित क्षेत्र म्हणून मनपा प्रशासनाने जाहीर केले आहे. जवळपास संपूर्ण शहरच कंटेनमेन्ट झोन झाले आहे. त्यामुळे येत्या 30 मे पर्यंत शहरात लॉक डाऊन व संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे.

करोनाचा पादुर्भाव पसरू नये यास्तव गुढीपाडवा श्रीराम नवमी हनुमान जयंती सह शबे बारात सण घरातच साजरा करण्याचे आदेश प्रशासनातर्फे देण्यात आले होते व या आदेशाचे पालनदेखील नागरिकांतर्फे केले गेले.

त्यामुळे शहरातील विषाणूचा उद्रेक लक्षात घेता रमजान ईद नमाजाबाबत प्रशासन यंत्रणा काय भूमिका घेते याकडे शहराचे लक्ष लागले आहे. शहरातील ए टी टी हायस्कूलच्या प्रांगणात रमजान ईद नमाज बाबत मुस्लिम धर्मगुरू व पोलीस प्रशासन यंत्रणेची बैठक संपन्न झाली.

यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख डॉ आरती सिंग यांनी ईद ची नमाज पादुर्भाव रोखण्यासाठी घरातच पठाण करण्याचे आवाहन केले. यावेळी आमदार मौलाना मुक्ती यांच्यासह धर्मगुरूंनी इदगा मैदानावर ईदच्या नमाज पठणाचे महत्व विशद केले.

पवित्र रमजान महिन्यात महिनाभर रोजे ठेवले गेले. तरावी ची नमाज व कुराण पठण करण्यात आले. याचा शुक्रणा अदा करण्यासाठी ईदगाह मैदानावर नमाज पठण करणे महत्त्वाचे असते. यासंदर्भात इदगा मैदानावर नमाज अदा करा असा हुकूम सुद्धा आहे. अशी माहिती देत आ. मौलाना मुफ्ती यांनी शासनाच्या आदेशाचे पालन करत शब्बे बारात, शुक्रवार तसेच रमजान काळात तरावीसह सर्व नमाजपठण घरातच करण्यात आले आहे.

मात्र, इदगा मैदाणावर ईदच्या नमाज पठणाचे महत्व आहे. त्यामुळे आम्हाला परवानगी दिली जावी जिल्हा पोलीस प्रमुख यांनी आमच्या भावना शासनाला कळवाव्यात शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन ईदच्या नमाजासाठी देखील केले जाईल अशी ग्वाही मौलाना मुक्ती यांनी दिली. या बैठकीस मौलाना हमिद अजहरी मौलाना वाजिद अली आदींसह कुल जमात चे धर्मगुरू अप्पर पोलीस अधीक्षक संदीप घुगे उपाधिक्षक रत्नाकर नवले मंगेश चव्हाण आदि अधिकारी उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!