Type to search

नाशिक

कडवा योजनेच्या आढाव्यासाठी आमदार कोकाटेंचे मुख्याधिकाऱ्यांना पत्र

Share
सिन्नर : सिन्नरचे नवनिर्वाचित आमदार माणिकराव कोकाटे यांनी सिन्नर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महत्वपूर्ण ठरलेल्या कडवा पाणी योजनेचा आढावा घेण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात कोकाटे यांनी पालिका मुख्याधिकाऱ्यांना पत्र दिले असून तातडीने बैठक आयोजित करण्यास सांगितले आहे.
इगतपुरी तालुक्यातील कडवा धरणातून सिन्नर शहरासाठी २४ पाणी पुरवठा करणारी योजना कोकाटे यांनी गेल्या आमदारकीच्या काळात प्रस्तावित केली होती. ९० टक्क्यांपर्यंत काम पूर्ण झालेल्या या योजनेचा लाभ गेल्या पाच वर्षात न मिळाल्याने शहरवासियांना अडचणीचा सामना करावा लागत होता.
केंद्र सरकारच्या व्हीआयडीएसएसएमटी या योजनेतून कडवा धरणातून सदरची योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या कामाची वास्तव स्थिती व अडचणी जाणून घेण्यासाठी निवडून आल्यावर कोकाटे यांनी पुढाकार घेतला आहे.
योजनेचा ठेकेदार, पालिकेचे संबंधित अधिकारी यांची शासकीय विश्रामगृहावर बैठक बोलवावी व योजनेच्या पूर्ततेत येणाऱ्या अडचणींचा आढावा सादर करावा अशी सूचना कोकाटे यांनी मुख्याधिकाऱ्यांना पत्र देऊन केली आहे.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!