Friday, April 26, 2024
Homeनगरपाच नंबर साठवण तलावाचा प्रश्‍न मार्गी लावावा

पाच नंबर साठवण तलावाचा प्रश्‍न मार्गी लावावा

आमदार आशुतोष काळे यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना साकडे

कोपरगाव (प्रतिनिधी) – कोपरगाव शहराच्या नागरिकांचा पाणीप्रश्न पाच नंबर साठवण तलाव झाल्याशिवाय सुटूच शकत नाही. त्यामुळे आ. आशुतोष काळे यांनी पाच नंबर साठवण तलावाचा मुद्दा सातत्याने उचलून धरला आहे. या पाच नंबर साठवण तलावाचे काम तातडीने सुरू व्हावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांना आमदार आशुतोष काळे यांनी निवेदन देऊन साकडे घातले आहे.

- Advertisement -

कोपरगाव शहराच्या नागरिकांना पाणी पुरवठा करणार्‍या साठवण तलावांची साठवण क्षमता कमी झाल्यामुळे शहरातील नागरिकांना सातत्याने पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे कोपरगाव नगरपरिषदेने कोपरगावच्या नागरिकांना 2016 च्या उन्हाळ्यात तब्बल 23 दिवसांनी व मागील उन्हाळ्यात 15 दिवसांनी पाणी पुरवठा केला आहे. साठवण तलावांची साठवण क्षमता कमी झाल्यामुळे कोपरगाव शहरातील नागरिकांसाठी आरक्षित असलेला पाणीसाठा पूर्णपणे उचलला जात नाही. या पाणी टंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पाच नंबर साठवण तलावाचे काम सुरु करावे यासाठी आ. आशुतोष काळे यांनी मागील पाच वर्षांत उपोषण, धरणे व अन्य आंदोलने आणि न्यायालयात जाऊन या प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम केले आहे.

कोपरगाव शहरातील नागरिकांना सातत्याने भेडसावत असणार्‍या पाणी टंचाईवर नवीन पाच नंबर साठवण तलावाचे काम सुरु होणे हा एकमेव पर्याय आहे. यापूर्वी कोपरगाव शहरासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी 42 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना दिलेली आहे.

कोपरगाव शहराचा बिकट झालेला पाणीप्रश्न शरद पवार यांच्या माध्यमातूनच सुटू शकतो असा विश्वास असल्यामुळे आ. आशुतोष काळे यांनी शरद पवार यांना कोपरगाव शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी लक्ष घालावे, असे साकडे घातले आहे. आमदार आशुतोष काळे निवडणुकीपूर्वी व निवडून आल्यानंतरही सातत्याने चार नंबर साठवण तलावाचे खोलीकरण व पाच नंबर साठवण तलावाचे काम सुरु करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत.

नागपूर येथे शरद पवार आले असता आ. आशुतोष काळे यांनी शरद पवार यांना कोपरगाव शहराच्या पाणी प्रश्नाविषयी असलेल्या अडचणी सांगून पाच नंबर साठवण तलावाचे काम तातडीने सुरु व्हावे यासाठी निवेदन दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या