Friday, April 26, 2024
Homeनगरकामचुकार अधिकार्‍यांची गय नाही : आमदार जगताप

कामचुकार अधिकार्‍यांची गय नाही : आमदार जगताप

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मागील आठवड्यामध्ये नगर शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात अधिकारी, इंजिनिअर, विभाग प्रमुख आदींसह

- Advertisement -

सुमारे सात तास बैठकीमध्ये विविध प्रश्नांवर चर्चा करून उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले. या पार्श्वभूमीवर शहरामध्ये विविध ठिकाणी रस्त्यावरील साफ सफाई रस्त्याच्याकडेने असलेले दगड गोटे, गवत साफसफाई करण्याच्या कामास सुरूवात झाली.

तसेच पाऊस उघडल्यानंतर लगेच महानगरपालिका हद्दीतील रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यांचे मजबुतीकरण व खडीकरण करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. यापुढील काळात कामचुकारपणा करणार्‍या अधिकार्‍यांची गय केली जाणार नाही प्रत्येकाने आपआपली जबाबदारी सक्षमपणे पार पाडावी, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले आहे.

गंगा उद्यान रोडवरील खड्ड्यांची पाहणी करताना आ. जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, नगरसेवक प्रकाश भागानगरे, संजय ढोणे, माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर, अमोल गाडे, अमित खामकर, घनकचरा विभाग प्रमुख डॉ. पैठणकर, विद्युत विभाग प्रमुख मेहेत्रे, अभिजीत चिप्पा, पुष्कर कुलकर्णी, गोरख पडोळे आदी उपस्थित होते.

यावेळी महापौर वाकळे म्हणाले, नगरशहरामध्ये पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला परंतु पावसामध्ये डांबराने खड्डे बुजविण्याचे काम हाती घेता येत नाही. आता पाऊस उघडला आहे. नगर शहरातील सर्व खड्डे बुजविण्याचे काम हाती घेणार आहे.

नगर शहरातून महामार्ग व राज्यमहामार्गाचे रस्ते जात असून यावरही मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत ते बुजविण्याचे काम बांधकाम विभाग लवकरच सुरू करणार आहे. नगर शहरामध्ये अमृत भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे. तसेच पावसामुळे डांबरीकरणाची कामे करता येत नाही. विविध रस्त्याची कामे मंजूर असून लवकरच या रस्त्याची कामेही सुरू होतील, असे त्यांनी यावेळी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या