आमदार जगताप, आमदार कर्डिले, कोतकरांसह 30 जणांविरुद्ध गुन्हा

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – केडगावातील दुहेरी हत्याकांड प्रकरणी तीन विद्यमान आमदार अरुण जगताप, संग्राम जगताप व शिवाजी कर्डिले यांच्यासह भानुदास कोतकर आणि त्यांचे पुत्र संदीप कोतकर यांच्यावर कटाचा गुन्हा दाखल झाला आहे. अन्य 25 जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल झाला. पारनेर पोलिसात हजर झालेला आरोपी संदीप गुंजाळ याला अटक करण्यात आली आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी उशिरा रात्री माध्यमांना माहिती दिली. केडगावचे शिवसेना शहरउपप्रमुख कोतकर व ठुबे यांच्या हत्येप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. आ. अरुण जगताप, आ. संग्राम जगताप, आ. कर्डिले यांच्यासह पाच जणांनी कट रचून हे हत्याकांड घडविण्यासाठी आरोपी गुंजाळ याला प्रेरित केल्याचे कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या पाच जणांविरुध्द 120 ब कलम लावण्यात आले आहे. त्यामुळे या घटनेला गंभीर राजकीय वळण लागले आहे.

गोळीबार करणारा संदीप गुंजाळ, केडगाव पोटनिवडणुकीत विजयी उमदेवार विजय कोतकर आदींसह 30 जणांचा आरोपीत समावेश आहे. ही फिर्याद मृत कोतकर यांचा मुलगा संग्राम संजय कोतकर यांनी दिली आहे. पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार आरोपींविरुद्ध भा.द.वि. 302, 120/ब, 143, 144, 145, 148, 149, आर्मअ‍ॅक्ट 3/4 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.

LEAVE A REPLY

*