Video : आम्ही केवळ रेल्वेच नाही तर विमान पण रोकू – आमदार बच्चू कडू

0
नाशिक : शेतकऱ्याला नेत्याची गरज नाही, जो शेतकरी शेतात नांगर घालू शकतो तो तुमच्यातही नांगर घालू शकतो.  सत्ता बदलते पण शेतकरी बदलत नाही. आम्ही केवळ रेल नाही, तर विमान पण रोकु असे आमदार बच्चू कडू यांनी सांगितले. ते आज नाशिकमध्ये झालेल्या शेतकरी परिषदेत बोलत होते.

बच्चू कडू पुढे म्हणाले,  जात, धर्म बाजुला ठेवा आणि एकत्र होत  हातात नांगर पण डोक्यात शेतकरी ठेवा. आता शेतकऱ्याचा कट्टरवाद पाहणार आहे,  तेव्हा गर्व से कहो हम किसान है| ही भावना ठेवा.

आता गनिमी कावा करावा लागेल, जेवढे पोटे वाढली तेवढी कमी करावी लागतील. आमचे फक्त भांडण शेतकऱयांच्या विरोधात असणाऱ्यांशी आहे.

खाणाऱ्याचा विचार करता मग  पिकवणाऱ्याचा विचार नाही करत का?  आयात निर्यात धोरणे चुकीचे आहेत. तिकडून तलवारी चालवत असाल तर ईकडून आम्ही बॉम्ब फेकू असेही बच्चू कडू यावेळी म्हणाले.

पुढे जर पोलिसांनी अतिरेक केला तर पोलीस महासंचालकांच्या कार्यालयावर मोर्चा करू.  3.5 लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत याकडे सरकारने गांभीर्याने बघण्याची गरज असल्याचे बच्चू कडू म्हणाले.

 

LEAVE A REPLY

*