कायम ऑनलाईन माहिती मागणार्‍या सरकारला ऑफलाईन करा : आ. बच्चू कडू

0
कर्जत (प्रतिनिधी) – राज्य व केंद्र सरकार काही झाले की, ऑनलाईन करा असे आदेश देते. कर्जमाफी ऑनलाईन, उडीद खरेदी ऑनलाईन, मका खरेदी ऑनलाईन असे काही पण मागा ऑनलाईन, यामुळे आता शेतकरी आणि जनतेने या सरकारला ऑनलाईन मतदान करून कायमचे ऑफलाईन ठेवावे असे आवाहन करत शासनाने शेतकर्‍यांचे वीज कनेक्शन तोड मोहीम 15 नोव्हेंबरपर्यंत थांबविली नाहीतर 16 नोव्हेंबर रोजी मुंबईला जाणारा वीज पुरवठा तोडण्याचा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे.
कर्जत तालुक्यातील आंबीजळगाव येथे आमदार बच्चू कडू यांच्या प्रयत्नातून बांधण्यात आलेल्या पुलाचे उद्घाटन करण्यासाठी ते आले होते. यावेळी झालेल्या सभेमध्ये ते बोलत होते. यावेळी सुभाष पवार, अतुल खुपसे, शिवाजी नांदखिले, बाळासाहेब सांळुके, दादासाहेब सोनमाळी, अ‍ॅड. हर्ष शेवाळे, प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष राजेंद्र गोरे, बबन म्हस्के, श्रीराम गायकवाड, पिेंटू धांडे, संजय तोरडमल, महेंद्र धांडे, विलास निकत, रवींद्र कोठारी, मोतीराम धोदाड, भास्कर भैलुमे, शिवाजी सुद्रिक, जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पोकळे आदी उपस्थित होते.
आ. बच्चू कडू म्हणाले, देशात शेतकरी सर्वात जास्त आहे. मात्र देश नोकरशाही व व्यापारी चालवतात. राज्यातील सरकारने शेतकर्‍यांची फसवणूक चालवली आहे. सरकराने उडीद हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले आहे. मात्र यासाठी सातबारा उतार्‍यावर नोंद पाहिजे आणि एकरी फक्त दोन क्विंटल उडीद खेरदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सरकारला शेतामध्ये फारसे कळत नाही. उडदाचे एकरी उत्पादन किती येते, याची महिती राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शेतामध्ये आणून दाखवा म्हणजे त्यांना समजेल की, एकरी उडीद 7 ते 10 क्विंटल उत्पादन घेणारे शेतकरी आहेत हे समजेल. प्रास्ताविक विलास निकत यांनी केले.

LEAVE A REPLY

*