पोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोड प्रकरण : आ. अरुण जगताप यांना जामीन

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – एसपी ऑफिस तोडफोड प्रकरणात आरोपी असलेले राष्ट्रवादीचे आमदार अरुण जगताप व ओंकार कैलास गिरवले हे शुक्रवारी पोलिसांना शरण आले. दरम्यान त्यांना न्यायालयात हजर केले असता 25 हजारांच्या जात मुचलक्यावर न्यायालयाने जामीन मंजूर केला.

केडगाव येथील शिवसैनिकांच्या हत्यांनंतर पोलिसांनी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना ताब्यात घेतले होते. त्यावेळी एसपी ऑफिसची तोडफोड करत संग्राम जगताप यांना पळवून नेल्याचा गुन्हा भिंगार पोलिसांत दाखल झाला.

या गुन्ह्यात भाजपाचे आमदार शिवाजी कर्डिले, आमदार अरुण जगताप, माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांच्यासह राष्ट्रवादीचे शंभरावर अधिक पदाधिकारी, कार्यकर्ते आरोपी आहेत. बहुतांश आरोपी हजर होऊन कायदेशीर जामीन घेत सुटले आहेत.

केडगाव येथील दोघा शिवसैनिकाची हत्या झाल्याप्रकरणी आमदार अरूण जगताप यांच्यावर कट रचल्याचा आरोप ठेवलेला आहे. दरम्यान, सीआयडींनी नुकतेच या हत्याकांडाचे दोषापपत्र कोर्टात सादर केलेले आहे. त्यात आ. जगतापचे नाव नसल्याचे आढळून आले.

मात्र, आ.जगतापांवर एसपी ऑफिस तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात शुक्रवारी ते स्वतः पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर झाले.  यावेळी त्यांना न्यायालयात उभे केले असता सरकारी वकीलांकडून युक्तीवाद करण्यात आला. यात आरोपी हे लोकप्रतिनिधी आहे.

त्यांच्याकडून साक्षीदारांवर दबाब आणण्याचा धोका आहे. तर आरोपीच्या वतीने अ‍ॅड. सुरेश लगड यांनी युक्तीवाद करत या प्रकरणाचा तपास पूर्ण झालेला आहे. आरोपी हे लोकप्रतिनिधी असून त्यांच्याकडून कोणतेही शस्त्र जप्त करण्यात आलेले नाही. दोन्हीबाजूचा निकाल ऐकून घेतल्यावर आ. जगताप व गिरवले यांची 25 हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला.

 

 

LEAVE A REPLY

*