शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांची आमदारकी हायकोर्टाकडून रद्द!

0
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्याचे वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्यसविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची आमदारकी रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.

अर्जुन खोतकर यांनी 2014 विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज उशिरा दाखल केल्याचा ठपका हायकोर्टाने ठेवला आहे. या प्रकरणी खोतकरांचे प्रतिस्पर्धी उमेदवार कैलास गोरंट्याल यांनी याचिका दाखल केली होती. त्यावरील सुनावणीदरम्यान हायकोर्टाने शुक्रवारी खोतकर यांची आमदारकी रद्द केली.

2014 विधानसभा निवडणुकीमध्ये खोतकर केवळ २९६ मतांनी विजयी झाले होते.

यावर एक महिन्याचा स्टे दिला असून आपण या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*