उद्यापासून मिशन इंद्रधनुष्य लसीकरण; सुमारे 4 हजार बालक, मातांना होणार लाभ

0
नाशिक । बालमृत्युचे प्रमाण कमी करण्यासाठी, सुरक्षित मातृत्व आणि गरोदर मातांच्या आरोग्यसाठी उद्यापासून (दि.8) युनिशेफ, केंद्र, राज्य सरकार यांच्या विद्यमाने जिल्हापरिषदेच्या आरोग्य विभागामार्फत मिशन इंद्रधनुष्य हीलसीकरण मोहिम राबवण्यात येणार आहे. यात तीन हजार 279 बालके, तर 534 मातांना लसीकरणाचा लाभ होणार आहे.

नियमित लसीकरण कार्यक्रमात काही बालके आणि माता वंचित राहिल्याने सार्वजनिक आरोग्य विभागाने जिल्ह्यात आठ ते 16 ऑक्टोंबर दरम्यान मिशन इंद्रधनुष्य हा लसीकरणाचा पहिला टप्पा राबवण्याचे निश्चित केले आहे. जिल्ह्यात यासाठी 453 ठिकाणे लसीकरणासाठी निश्चित करण्यात आली आहे.

मिशनसाठी सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यातील सर्व वैदयकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे सहाय्यक, अंगणवाडी कार्यकर्ती, आशा गट प्रवर्तक यांना त्यात मार्गदर्शन करण्यात आले होते. आरोग्य सभा घेऊन त्यात कार्यक्रमाची रुपरेषा निश्चित करण्यात आली होती.

मिशनचे चार टप्पे होणार असून, वंचित बालके आणि माताना लसीकरण करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद. ग्रामीण आरोग्य केंद्रातंर्गत येणार्‍या सर्व गावांमध्ये आरोग्य कर्मचारी घरोघरी जावून महिला आणि बालकांना लसीकरण करणार आहेत.

त्याचबरोबर गावांगावांमध्ये लसीकरणाची माहिती वहावी, जनजागृती व्हावी, यासाठी आरेाग्य विभागाने पोस्टर, बॅनर लावले आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात येणार आहे. महिला सभांमध्ये याची माहिती देण्यात येणार आहे. त्यानंतर मुख्य ग्रामसभेत या विषयावर चर्चा करून गावांमध्ये लसीकरण मोहिम प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. महिला आणि बालकांना लसीकरण करून घेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे यांनी केले आहे.

मिशन इंद्रधनुष्य लसीकरण मोहिमेचे सुक्ष्म नियोजन करण्याच्या सुचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मिना यांनी दिलेले आहे. कार्यक्रमाला मार्गदशन जिल्हा शल्य चिकित्सव डॉ. सुरेश जगदाळे, डॉ. कमलाकर लष्करे, डॉ. अनंत पवार, डॉ. रविंद्र चौधरी, डॉ. दावल साळव, डॉ. शैलेश निकम याचे लाभले आहे. वैद्यकीय अधिक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रोचे अधिकारी लसीकरण मोहिमेच्या संयोजनासाठी परिश्रम घेत आहे.

LEAVE A REPLY

*